शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिवकालीन कोरीगडावर स्वच्छता आणि श्रमदान मोहीम; नितेश राणे यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 16:11 IST

आंबवणे गावाजवळील कोरीगडावर गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवप्रेमींनी कोरीगडावरील या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत श्रमदान केले.

ठळक मुद्देनितेश राणे यांनी गडावर पोहचत कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावत मोहिमेत केले श्रमदानगडकिल्ल्यांची जेवढी काळजी घेत आहोत तशीच शिवरायांच्या इतिहासाचीही घ्यावी : नितेश राणे

लोणावळा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा आणि ठेव्याची जपणूक करण्यासाठी राजमाता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त रविवार (दि. २८) रोजी आंबवणे गावाजवळील कोरीगडावर गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत स्वच्छता आणि श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत शेकडो शिवप्रेमींनी कोरीगडावरील या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत श्रमदान केले. भल्या सकाळीच कोरीगडाच्या पायथ्याला दाखल झालेल्या आमदार नितेश राणे यांनी गडावर पोहचत कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावत मोहिमेत श्रमदान केले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना आमदार नितेश राणे म्हणाले, की शिवरायांचे हे गडकिल्ले आणि त्यांचा इतिहास जाणून घेतल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. आपली छाती अभिमानाने फुलून येते. शिवरायांच्या या अमूल्य विचारांचे आणि त्यांच्या ठेव्याचे आपण सर्वांनी जतन केले पाहिजे. गडकिल्ल्यांची आपण जेवढी काळजी घेत आहोत तशीच काळजी शिवरायांच्या इतिहासाचीही घेतली पाहिजे.यावेळी स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे लोणावळा अध्यक्ष शौकत शेख, राजमाता प्रतिष्ठानचे संतोष गायकवाड, सरपंच मच्छिंद्र कराळे, पिंपरी चिंचवड स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष हेमंत चव्हाण, खालापुर अध्यक्ष आकाश सटाणे, अभिषेक ओव्हाळ, इम्रान शेख, संकेत कुटे, इरफान शेख, साजिद शेख, साहिब अन्सारी, आशिष गुप्ता, संकेत जाधव, केदार मुगल, सागर बेल्लुर, अल्पेश दास, सचिन शिंदे, मंगेश कदम, समिर शेख, सादिक शेख, अक्षय मोरे, अमिर खान, बापुसाहेब शेळके, विशाल मांगडे, मंगेश पवार, संतोष रणपिसे, सुधाकर मिरगणे यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNitesh Raneनीतेश राणे pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड