शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सहशहर अभियंत्याची उचलबांगडी, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 03:37 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अतिक्रमणाला कारणीभूत असल्याच्या तक्रारी आल्याने आणि एकाच विभागात ठिय्या मांडून बसलेल्या बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभागात ठाण मांडून बसणा-या सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांची बदली केली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील अतिक्रमणाला कारणीभूत असल्याच्या तक्रारी आल्याने आणि एकाच विभागात ठिय्या मांडून बसलेल्या बांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभागात ठाण मांडून बसणाºया सहशहर अभियंता अयुबखान पठाण यांची बदली केली आहे. त्यांच्याकडे आता केवळ पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कामकाज सोपविले आहे.नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील भाजपा नेत्यांच्या व्यावसायिक अवैध बांधकामांना प्रशासनाचे पाठबळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला. त्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सहशहर अभियंत्यांना चांगलेच फैलावर घेतले. अयुबखान पठाण यांच्याकडून खुलासा मागविला. अवैध व्यावसायिक बांधकामांना जबाबदार असलेल्या उपअभियंता, बीट निरीक्षकांची नावे मागविली. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला. त्यामुळे पठाण रडारवर आले.दरम्यान, एकाच जागेवर असलेल्या पठाण यांच्याविषयी ‘राजकीय आशीर्वादाने एकाच विभागात’ असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. निवृत्तीआधी चौकशीचा ससेमिरा नको, अशी विनवणी केल्यावर आयुक्तांनी शिक्षेचे स्वरूप बदलले.बांधकाम विभागातच होते ठाण मांडूनबांधकाम परवानगी व अवैध बांधकाम नियंत्रण विभाग महापालिका कामकाजात सर्वांत महत्त्वाचा आहे. या विभागातून बांधकाम परवाना दिला जातो. या विभागातून यापूर्वी केवळ परवाना देण्याचे काम चालायचे. मात्र, तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बांधकाम परवानगी विभागाला अवैध बांधकाम विभागही जोडला. जबाबदारी निश्चित केली. त्यामुळे शहरातील अवैध बांधकामाला हाच विभाग कारणीभूत असल्याचा आक्षेप आहे.महापालिकेत २४ मार्च १९८१ मध्ये अयुबखान पठाण कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले. त्यानंतर १९८६ ते ९५ या काळात त्यांनी बांधकाम विभागात उपअभियंता या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची दोन वर्षे दुसºया विभागात बदली झाली. १९९७ ला ते पुन्हा बांधकाम विभागात आले. २००० मध्ये त्यांची बांधकाम विभागातून बदली झाली. त्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा विभागात उपअभियंता म्हणून तसेच जलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कामकाज पाहिले. २०१३ मध्ये ते पुन्हा बांधकाम विभागात आले. २०१३ पासून आजपर्यंत तेथेच कार्यरत असून त्यांच्याकडे सध्या सहशहर अभियंता पद आहे. तब्बल १६ वर्षे त्यांनी बांधकाम विभागात काम केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड