शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे सुचविण्यात पिंपरी-चिंचवड शहरवासियांची अनास्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 13:13 IST

नागरिकांना दहा लाखांपर्यंत कामे सुचविण्याची करून दिली जाते संधी उपलब्ध

ठळक मुद्देमहापालिकेच्या २०२०-२१ या वर्षीचा नियोजित अर्थसंकल्प १८ फेब्रुवारीला सादर होणार सुचविलेल्या कामाचा खर्च १० लाख रुपयांपर्यंत असावा एवढीच एकमेव अट

पिंपरी : महापालिकेच्या २०२०-२१ या वर्षीचा नियोजित अर्थसंकल्प १८ फेब्रुवारीला सादर होणार आहे. अर्थसंकल्पामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांना दहा लाखांपर्यंत कामे सुचविण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. मात्र, कामे सुचविताना नागरिकांमध्ये अनास्था असल्याने दिसून येत आहे. नियोजित अंदाजपत्रकासाठी नागरिकांच्या केवळ २१ सूचना आल्या आहेत.  पाच क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकाही नागरिकाने सूचना केलेली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा. यासाठी  महापालिकेच्या वतीने सन २००७-०८ पासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश केला जातो. त्यानुसार अर्थसंकल्प तयार करताना नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. शहरातील विविध विकासकामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावीत, योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि लक्ष असावे, अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा, यादृष्टीने नागरिकांकडून अर्थसंकल्पासाठी सूचना मागविण्याचा उपक्रम महापालिकेकडून राबविला जात आहे.नागरिकांच्या सहभागाचे धोरणविकासात नागरिकांचा सहभाग असावा यासाठी अर्थसंकल्पात लोकसहभागाची संकल्पना तयार केली आहे. या अंतर्गत नागरिकांना आपापल्या परिसरातील एखादे सार्वजनिक काम अर्थसंकल्पात सुचवता येते. त्यासाठी सुचविलेल्या कामाचा खर्च १० लाख रुपयांपर्यंत असावा एवढीच एकमेव अट महापालिकेने घातली आहे. मात्र, त्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे..........अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी  महापालिकेच्या वतीने नागरिकांना कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार २१ सूचना आल्या आहेत. कचरापेटींची व्यवस्था, फुटपाथ तयार करणे, रस्त्यांचे डांबरीकरण, दिवे लावणे, सिग्नल बसविणे, बसस्थानक उभारणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, वृद्धांसाठी बैठक व्यवस्था करणे, बागा किंवा उद्यानातील सुधारणा आदी कामांबाबत नागरिकांनी सूचना केल्या आहेत.’’- जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापाल..........महापालिकेचा अर्थसंकल्प हा वास्तववादी करण्यावर भर असणार असून, येत्या १७ किंवा १८ फेब्रुवारीला स्थायी समिती सभेस सादर केला जाणार आहे.- श्रावण हर्डीकर, आयुक्त. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBudgetअर्थसंकल्पshravan hardikarश्रावण हर्डिकर