शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना कीव; पण प्रशासन निगरगठ्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:12 IST

देहू-आळंदी रस्त्यावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजविले; अधिकाऱ्यांची मात्र डोळेझाक

देहूगाव : अपघातस्थळ आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या देहू-आळंदी रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या श्रमदान व आर्थिक सहकार्यातून झाले. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन व पिंपरी-चिंचवड महापालिकेने डोळेझाक केल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.पालखी प्रस्थानापूर्वी दोन दिवस अगोदर बुजविण्यात आलेले खड्डे पावसामुळे पुन्हा अवघ्या काही दिवसांतच उखडल्याने मृत्यूचा सापळा व अपघातस्थळ बनलेला आहे. या रस्त्याने नियमित येणाºया वाहनचालकांना वाहन जीव मुठीत धरून चालवावे लागत होते. ग्रामपंचायतीने हा रस्ता पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे वर्ग केला असल्याने या रस्त्यावर त्यांना खर्च करणे प्रशासकीय दृष्ट्या अडचणीने असल्याचे सांगत रस्त्याचे खड्डे बुजविणे टाळले जात आहे. तर पिंपरी-चिंचवड पालिकेने देखील हा रस्ता वारंवार दुरुस्त केला आहे. या रस्त्याची खरी अडचण आहे, ती या राज्य महामार्गाचा दर्जा असलेल्या रस्त्याची दुरुस्ती-देखभाल खर्च किती करायचा, रस्त्यासाठी पालिकेने निधीही मंजूर केला आहे. मात्र, तो खर्च करण्याचे टाळत असल्याचे लक्षात येत आहे. याशिवाय या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न भूसंपादनामुळे भिजत पडलेला आहे. यासाठी सक्षम अधिकारी आवश्यक आहे. येथील शेतकरी रस्ता करण्यास सहकार्य करीत आहेत. मात्र कोणाच्या तरी चुकीच्या मार्गदर्शनाखाली किंवा सांगण्यावरून ते अधिकारी टाळाटाळ करीत असल्याची दबक्या आवाजात गावात चर्चा आहे. तर गावातील पदाधिकारी कामाचे श्रेय घेण्यासाठीच केवळ पत्रव्यवहाराचा खटाटोप करीत असल्याचीही चर्चा आहे.तरुणांनी केले श्रमदानप्रशासनाच्या असहकाराला कंटाळून गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन सक्षम लोकांच्या सहकार्यातून आपणच रस्त्याचे खड्डे बुजवायचे असा निर्णय झाला. यानुसार सकाळपासून देहूगाव शिवसेनाप्रमुख सुनील हगवणे, श्री संत तुकाराममहाराज संस्थानाचे विश्वस्त अभिजित मोरे, शांताराम हगवणे यांनी वीटभट्टीचे रॅबिट व विटांचा चुरा रस्त्यावर टाकून त्याला समतल करण्याचे काम सुरू करण्यात आले. महेश मोरे, रामकुमार आगरवाल यांच्यासह काही तरुणांनी श्रमदान केले.

टॅग्स :dehuroadदेहूरोडPotholeखड्डेroad transportरस्ते वाहतूक