शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एम्पायर इस्टेट मधील ‘रॅम्प’ ला नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 19:52 IST

१०० कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या या भागातील उड्डाणपुलाचा त्रास स्थानिक नागरिकांनी सोसला आहे.कामासाठी झालेला विलंब व नियोजनातील बदल यामुळे नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त होते.आता याच पुलाला जोडून रॅम्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, रहिवाशांनी या रॅम्पच्या विरोधात भूमिका घेतली आहे. 

ठळक मुद्देचुकीच्या निर्णयाला आमचा विरोध असून या कामाविषयी योग्य नियोजन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन रॅम्प बाबत न्यायालयात दाद मागितली असल्याने हे काम त्वरित बंद करावे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करणार

पिंपरी चिंचवड: चिंचवड मधील एम्पायर इस्टेट येथील पुलाचा आराखडा बदलून तेथे रॅम्प उभारणी करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी वारंवार केला आहे. पालिका प्रशासनाच्या या  नियोजनाबाबत स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे व त्या परिसरातील नागरिकांच्या वतीने त्याला कडाडून विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड महापालिका भवनावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. १०० कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या या भागातील उड्डाणपुलाचा त्रास स्थानिक नागरिकांनी सोसला आहे.कामासाठी झालेला विलंब व नियोजनातील बदल यामुळे नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त होते.आता याच पुलाला जोडून रॅम्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, रहिवाशांनी या रॅम्पच्या विरोधात भूमिका घेतली आहे.   रॅम्पबाबत न्यायालयात दाद मागितली असल्याने रॅम्पचे काम सध्या बंद करावे, या मागणीसाठी नागरिकांनी एकत्र येत शनिवारी निषेध मोर्चा काढला. या मोर्चात एम्पायर फेडरेशनचे संजय शेवाळे,संतोष पिंगळे,रणजित एडके,राजेश रेगुंठा,हरिष ललवाणी,माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्यासह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.   पालिका प्रशासनाने रॅम्प प्रकल्पाबाबत ले-आऊट तयार केला असून या कामाला सुरवात केली आहे.मात्र,यामध्ये अनेक त्रुटी असून काही नियम धाब्यावर बसवत मनमानी पद्धतीचे नियोजन केल्याचा आरोप नागरिकांमार्फत करण्यात आला आहे. पुणे-मुंबई महामार्गाजवळ असणाºया सोसायटीमधून दर वर्षी कोट्यावधी रुपयांचा कर महापालिकेला मिळत आहे. तरीही त्या परिसरातील रहिवाशांच्या अडचणी विचारात न घेता चुकीचे निर्णय घेत असल्याचे सोसायटीचे पदाधिकारी म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाने तोडगा काढणे महत्वाचे आहे.प्रशासनाने या प्रकल्पाविषयी कोणतीही सखोल चर्चा न करता परस्पर निर्णय घेऊन नवीन रॅम्प उभारण्याचे काम करण्याचा घाट घातला आहे. या चुकीच्या निर्णयाला आमचा विरोध असून या कामाविषयी योग्य नियोजन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज आयुक्तांना देण्यात आले.स्थानिक रहिवाशी आता एकजुटीने या रॅम्पला विरोध करण्यासाठी पुढे आले आहेत. दहा हजार रहिवाशी असणाऱ्या सोसायटीला या रॅम्पमुळे अडचणी येणार असून वाहतुक कोंडीची समस्या देखील निर्माण होणार असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.  या रॅम्प बाबत न्यायालयात दाद मागितली असल्याने हे काम त्वरित बंद करावे. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. ........

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड