शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने अरेरावी केल्याने महापालिका अभियंत्यास नागरिकांचा घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 19:49 IST

बहिरट ब्रदर्स या ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने या वेळी तक्रार करणाऱ्या स्थानिक नागरिकांना अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला. 

रावेत : वाल्हेकरवाडी येथील भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र रस्ता स्वच्छ न करता, तसेच कमी प्रमाणात डांबर वापरून रस्त्याचे काम सुरू आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. संबंधित बहिरट ब्रदर्स या ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने या वेळी तक्रार करणाऱ्या स्थानिक नागरिकांना अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला. 

वाल्हेकरवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे गेल्या दहा वर्षांपासून डांबरीकरण झाले नव्हते, अशा रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. रस्ता स्वच्छ करून त्यावर डांबर ओतून खडीकरण करणे आवश्यक असते. मात्र शिवतीर्थ कॉलनीत रस्ता स्वच्छ न करताच कमी प्रमाणात डांबराचा वापर करून डांबरीकरण केले जात असल्याची तक्रार काही स्थानिक नागरिकांनी केली. त्यामुळे उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी या कामाची पाहणी केली. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत त्यांनी काम बंद करण्याच्या सूचना केल्या. काम बंद झाल्याने संबंधित ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी  शिवतीर्थ कॉलनीतील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे, अशा सूचना कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांनी संबंधित ठेकेदारास केल्या.

ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाकडून उडवाउडवीची उत्तरे ठेकेदाराने महापालिकेचे नियम धाब्यावर बसवून काम सुरू केले आहे. या कामासाठीचे डांबर हलक्या दर्जाचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी निकृष्ट कामे करून केली जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित अधिकारीही या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे. याबाबत ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाला विचारले असता, मद्याच्या नशेतील पर्यवेक्षकाने, काय करायचं ते करा,’ असे सांगून बेजबाबदारपणे उडवाउडवीची उत्तरे स्थानिकांना दिली.

वाल्हेकरवाडी परिसरात विविध ठिकाणी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीत डांबरीकरणाचे काम सुरू होते. ते नियमानुसार न करता केवळ करायचे म्हणून ठेकेदाराने केले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला बोलावून घेतले. कामाची पाहणी केली असता कोणत्याही प्रकारच्या नियमाचे पालन न करता निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केलेले निदर्शनास आले. याबाबत संबंधित ठेकेदार आणि अभियंता यांना रस्ता पुन्हा करण्याचे सांगण्यात आले आहे.- सचिन चिंचवडे, उपमहापौर

सदर कामाची मी पाहणी केली असता, एका ठिकाणी मारण्यात आलेला पॅच निकृष्ट आढळून आला. संबंधित ठेकेदाराला तो पॅच जेसीबीच्या साह्याने काढून तेथे योग्य पद्धतीने काम करण्याचे आदेश दिले आहेत.- उमेश मोने, कनिष्ठ अभियंता, ब प्रभाग 

टॅग्स :Puneपुणेroad transportरस्ते वाहतूकalcohol prohibition actदारुबंदी कायदा