पेट्रोलला इथेनॉलचा पर्याय, पिंपरीत होणार राष्ट्रीय परिषद; ऊस, मका उत्पादनाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:35 AM2017-11-21T01:35:16+5:302017-11-21T01:35:28+5:30

पिंपरी : वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. वाहनांसाठी लागणारे इंधन हे परदेशातून आयात करावे लागते.

 The choice of ethanol for petrol; Advantages of Sugarcane, Maize Product | पेट्रोलला इथेनॉलचा पर्याय, पिंपरीत होणार राष्ट्रीय परिषद; ऊस, मका उत्पादनाला फायदा

पेट्रोलला इथेनॉलचा पर्याय, पिंपरीत होणार राष्ट्रीय परिषद; ऊस, मका उत्पादनाला फायदा

Next

पिंपरी : वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. वाहनांसाठी लागणारे इंधन हे परदेशातून आयात करावे लागते. सुमारे ८२ टक्के क्रूड तेल परदेशातून मागवावे लागते. आपल्याकडे केवळ १८ टक्के साठा शिल्लक आहे़ पुढील काळात इंधनाचा तुटवडा भासणार आहे. पेट्रोलला इथेनॉल हा पर्याय असून, ऊस आणि मका या शेती उत्पादनांच्या माध्यमातून इथेनॉल निर्मितीचा पर्याय उपलब्ध आहे. याबाबत विविध संस्थांनी संशोधनही केले असून, वाहतूक व्यवस्थापनात इथेनॉलचा पर्याय परवडणारा ठरू शकेल, असा विश्वास केंद्र शासनाच्या जैवइंधन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
‘पेट्रोलला इथेनॉल या जैवइंधनाचा पर्याय’ या विषयावर २४ नोव्हेंबरला पुणे -नाशिक महामार्गावर भोसरी येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) येथे राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या अनुषंगाने सीआयआरटीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी इथेनॉल हा पेट्रोलला कसा पर्याय ठरू शकेल याबाबतची माहिती त्यांनी दिली. या वेळी ते म्हणाले, क्रूड तेल देशात आयात करून त्यावर सव्वापाच लाख कोटी रुपये खर्च होतो. त्यामुळे ४५ टक्के आर्थिक तूट सहन करावी लागते. इथेनॉलची निर्मिती होण्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्याकडे उपलब्ध आहे. कृषी क्षेत्रात काम करणाºया शेतकºयांकडून मका आणि ऊस या माध्यमातून कच्चा माल उपलब्ध होऊ शकेल. इथेनॉल वापरासाठी १० टक्क्यांपर्यंत शासनाने २००९ मध्ये मुभा दिली आहे. आतापर्यंत २.६ टक्क्यांपर्यंत आपण इथेनॉल वापर करीत आहोत. सीआयआरटीत होणाºया परिषदेत साखर कारखानदार, ऊस उत्पादक, इथेनॉलनिर्मिती करणाºया कंपन्यांचे प्रतिनिधींशी चर्चा होईल.
>मंत्र्यांची हजेरी : वाहतूक व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण
सीआयआरटीचे संचालक राजेंद्र सनेर पाटील यांनी सीआयआरटी संस्थेची माहिती दिली. वाहतूक व्यवस्थापनासंबंधी प्रशिक्षण आणि संशोधन करणारी ही देशातील महत्त्वाची संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. २४ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता सीआयआरटीत होणाºया इथेनॉलविषयी परिषदेस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, माजी कृषिमंत्री शरद पवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी प्रमुख परिषदेला उपस्थित राहाणार आहेत.

Web Title:  The choice of ethanol for petrol; Advantages of Sugarcane, Maize Product

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.