शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत एक्सरे मशीन फुटल्याने चिमुकली भाजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 11:34 IST

चिमुकल्या मुलीची एक्सरे तपासणी सुरु असताना घडली हीं दुर्घटना 

पिंपरी : चिमुकल्या मुलीची एक्सरे तपासणी करत असताना मशीन फुटल्याने चिमुकली भाजली. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरीतील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये  घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शार्वी भूषण देशमुख (वय 1) असे जखमी चिमुकलीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शावीर्ला युरिन इन्फेक्शन झाल्याने तिच्यावर मागील एक महिन्यापासून सांगवी येथील भालेराव चिल्ड्रन हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. भालेराव हॉस्पिटलमधून शार्वीच्या पालकांना काही तपासण्या करण्यास सांगितले. हॉस्पिटलकडून पिंपरी येथील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर मधून तपासण्या करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार, शार्वीच्या पालकांनी तिला पिंपरी येथील न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आणले. दुपारी साडेतीनच्या सुमारास शार्वी ला तपासणीसाठी लॅबमध्ये घेतले. शार्वीची  तपासणी सुरू असताना अचानक एक्सरे मशीनचा काही भाग फुटला. फुटलेल्या भागातून विशिष्ट प्रकारचे रसायन सांडले. हे रसायन शार्वी, तिची आई आणि आजोबांच्या अंगावर सांडले. त्यात शार्वी किरकोळ जखमी झाली. मशीनमधून रसायन सांडल्यानंतर सेंटरमधील कोणीही मदतीसाठी धावले नाही. सेंटरमधील डॉक्टरांनी या घटनेत हलगर्जीपणा दाखवला असून कोणीही मदतीस आले नाही. 'तुमच्या घरी झाले असते तर काय केले असते' असे डॉक्टरांनी उद्धटपणे सांगितले असल्याचे शावीर्ची आई प्रियंका यांनी सांगितले. दरम्यान, ही घटना वैद्यकिय क्षेत्राशी संबंधित असल्याने थेट गुन्हा दाखल करता येणार नाही. याबाबतची कागदपत्र ससून रुग्णालयाच्या समितीकडे पाठविणार आहे. त्या समितीचा निर्णय आल्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्युब फुटल्याने त्यातील तेल अंगावर उडाले आहे. आमच्या कर्मचा?्यांनी त्वरीत बाळाच्या अंगावर पाणी टाकून प्रथमोपचार केले. तसेच या घटनेत आमच्याकडून कोणताही हलगर्जीपणा झालेला नाही. हा केवळ एक अपघात आहे.- गिरीश मोटे, न्यूक्लिअस डायगणोस्टिक सेंटरचे अधिकारी.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारी