शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

चिखली मोशी हाऊसिंग गृहनिर्माण सोसायट्यांनी वाचला समस्यांचा पाढा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 19:53 IST

चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्या महापालिका प्रशासनासमोर मांडण्यासाठी परिसंवाद घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी आरोग्य, पिण्याचे पाणी आदी विविध प्रश्नावरून प्रशासनास धारेवर धरले. त्यानंतर ‘प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या. 

पिंपरी: चिखली मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्या महापालिका प्रशासनासमोर मांडण्यासाठी परिसंवाद घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी आरोग्य, पिण्याचे पाणी आदी विविध प्रश्नावरून प्रशासनास धारेवर धरले. त्यानंतर ‘प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या.  महापालिकेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी परिसंवाद झाला. यावेळी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सह शहर अभियंता मकरंद निकम, राजन पाटील, राजेंद्र राणे, संजय घुबे, राजेर पवार, संजय कुलकर्णी, श्रीकांत सावने, फेडरेशनचे अध्यक्ष विकास साने, सचिव संजीवन सांगळे आदी उपस्थित होते. फेडरेशनच्या वतीने, विविध सोसायट्यांच्या वतीने अनेक समस्या मांडल्या. आपण ज्या ठिकाणी राहतो, तो परिसर आणि समाज स्वच्छ, शुद्ध, सुरक्षित असायला हवा, एवढीच माफक अपेक्षा इथल्या नागरिकांची आहे,आमदार  लांडगे यांनी सांगितले. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  अधिका-यांना  तोडगा काढण्याचे निर्देश दिले. परिसरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी एक महिन्यात उपाययोजना करावी. च-होली, मोशी, चिखली परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरु आहेत. काही रस्त्यांची डागडुजी करण्याची गरज आहे. ती येत्या पंधरा  दिवसात करून घ्यावी. पुरेशी पार्किंग नसल्याची विविध सोसायट्यांची तक्रार आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकांना योग्य ते आदेश देऊन प्रसंगी त्यांच्या परवानग्या नाकारून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारचे आदेश आयुक्तांनी  दिले.आयुक्त म्हणाले, ‘‘शहराला स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी सर्वांची साथ महत्वाची आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. उत्तम रस्ते, फूटपाथ, दवाखाने, शाळा, बगीचे निर्माण केले जाणार आहेत. स्मार्ट सिटीत कचरा देखील स्मार्ट पद्धतीने गोळा केला जाणार आहे. हिंजवडीसाठी मोशी काळेवाडी फाटामार्गे इलेक्ट्रिक एसी बस लवकरच सुरु होणार आहे. महापालिकेने एक हजार बसची मागणी केली असून काही बस मिळाल्या आहेत. आधुनिक पद्धतीने एसटीपी प्लांट सुरु केले जातील. ज्यामुळे ते सोसायटीच्या जवळ नकोसे वाटणार नाहीत. प्रदूषण, आगीच्या घटना, कचरा, भंगार व्यवसाय यावर तोडगा काढण्यात येत आहे.’’  

टॅग्स :shravan hardikarश्रावण हर्डिकरGovernmentसरकार