शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

शहरवासीयांना नाटकांची पर्वणी, २७ व ३० डिसेंबरला आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 01:07 IST

पिंपरी शहराच्या सांस्कृतिक चळवळीत भर टाकणाऱ्या लोकमत सखी मंच आयोजित नाट्य महोत्सवाला बुधवारी सुरुवात झाली. रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात महोत्सव सुरू झाला.

पिंपरी : शहराच्या सांस्कृतिक चळवळीत भर टाकणाऱ्या लोकमत सखी मंच आयोजित नाट्य महोत्सवाला बुधवारी सुरुवात झाली. रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात महोत्सव सुरू झाला. सर्किट हाऊसला मोठा प्रतिसाद मिळाला.‘लोकमत’च्या वतीने औद्योगिकनगरीत नाट्य महोत्सव आयोजित करण्याची परंपरा सुरू केली आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात एचपी ज्वेलर्सप्रस्तुत आणि फॉर्च्युन वास्तुशिल्प डेव्हलपर्स यांच्या सहयोगाने आणि भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या सहकार्याने हा महोत्सव सुरू झाला. प्रारंभी लोकमतचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर, भूषण कडू, पिंपरी-चिंचवड महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा किरण भोईर, राणी पुतळाबाई लॉ कॉलेजचे संचालक अजय साळुंखे, ड्रीम व्हॅलीचे सुवर्णा विद्या, मकरंद पांडे, नितीन धिमधिमे आदी उपस्थित होते.लोकमतचे उपमुख्य उपसंपादक हणमंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विक्रम काळे यांनी सूत्रसंचालन केले. आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘शहराच्या सांस्कृतिक चळवळीत भर टाकणारा नाट्य महोत्सव लोकमतने आयोजित केला आहे. कलाविषयक उपक्रमांना बळ देण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. नाट्यरसिकता वाढीस लावणारा उपक्रम आहे.’’उद्घाटनानंतर विजय केंकरे दिग्दर्शित आणि भूमिका थिएटर्सचे ‘सर्किट हाऊस’ हे नाटक सादर झाले. गुरुवारी सायंकाळी पाचला सुनील बर्वे प्रस्तुत आणि सुबकनिर्मित निपुण धर्माधिकारीदिग्दर्शित ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक होईल. त्यात अमेय वाघ, सखी गोखले, पूजा ठोंबरे, सुव्रत जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहे. रविवारी दुपारी १२ला सचिन गोस्वामीदिग्दर्शित एकदंत प्रकाशित ‘आमच्या ‘ही’चं प्रकरण’ हे नाटक होईल. त्यात निखिल रत्नपारखी, भार्गवी चिरमुले, नंदिता पाटकर, आनंद काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.सुवर्णसखी योजना; तिकीटविक्री सुरू१लोकमत वाचकांसाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे तिकीटविक्री सुरू आहे. १०० रुपये प्रतिनाटक तिकीटदर आहे. लहान मुलांना प्रवेश नसून, प्रथम येणाºयास प्राधान्य असेल. यासह काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असून, कार्यक्रमाचे सर्व हक्क आयोजकांकडे राखीव राहतील. अधिक माहितीसाठी ०२०-६७३४५६७८, ८३७८९९९७५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.२एचपी ज्वेलर्स हिंमतलाल पी. अ‍ॅण्ड ब्रदर्सप्रस्तुत लोकमत सखी मंच सुवर्ण सखी योजना २०१८ आयोजित केली आहे. यामध्ये सखी मंच सदस्यांना सोने व चांदीची लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा लकी ड्रॉ जिल्हास्तरीय असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण विभागातून विजेता ठरणार आहे. पहिले बक्षीस एक लाखाचे सोन्याचे दागिने, दुसरे बक्षीस ७५ हजारांचे, तर तिसरे बक्षीस ५० हजारांचे सोन्याचे दागिने असे असेल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड