शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करताना जातीचा दाखला, वैधता प्रमाणपत्र आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:20 PM

मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत इच्छूक उमेदवाराला नामनिर्देशन अर्ज दाखल करताना अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीचा वैधतेचा दाखल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकागदपत्र नसलेले नामनिर्देशन अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत : रणजित देसाईनिवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरिता होणार पुरती दमछाक

लोणावळा : २५ फेब्रुवारी रोजी होणार्‍या मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित सरपंच पदासह आरक्षित सदस्य जागेवर निवडणूक लढवू इच्छिणार्‍या इच्छूक उमेदवाराला नामनिर्देशन अर्ज दाखल करताना अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीचा वैधतेचा दाखल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सदरची कागदपत्र नसलेले नामनिर्देशन अर्ज हे स्वीकारले जाणार नसल्याचे मावळ तालुक्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार रणजित देसाई यांनी स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सदर आदेशाची पत्र सर्व राजकिय पक्ष व ग्रामपंचायती, तलाठी कार्यालय यांना पाठविण्यात आली आहेत. यामुळे आरक्षित जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरिता पुरती दमछाक होणार आहे.

आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांकडून यापूर्वी नामनिर्देशन अर्जासोबत जातीचा दाखल व पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्राकरिता प्रकरण सादर केल्याची पोच (हमीपत्र) जोडण्याची तरतूद होती. तसेच निवडणुकीनंतर सहा महिन्यात हे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत होती. मात्र ३१ डिसेंबर २०१७ नंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जात वैधता प्रमाणपत्रा ऐवजी हमीपत्र घेण्याच्या सवलतीला मुदतवाढ देण्यात न आल्याने येत्या २५ फेब्रुवारी रोजी होणार्‍या महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतीसह मावळातील वडगाव, भाजे, वाकसई, लोहगड, सांगिसे, मुंढावरे या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर पुसाणे, शिलाटणे, आपटी, मळवली, आंबी, येलघोल, टाकवे बु।।, खांड, साते, खडकाळा, थुगाव, आंबेगाव, माळवाडी, वराळे या ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवरुन सदस्य पदाची तसेच सरपंच पदाची निवडणूक लढविणार्‍या इच्छूकांना महाराष्ट्र ग्रामपंचायती अधिनियम १९५८ च्या कलम १०-१ (अ) नुसार नामनिर्देशन अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे, अन्यथा सदरचे अर्ज हे स्वीकारले जाणार नसल्याचे निवडणूक विभागाच्या नायब तहसिलदार सुनंदा भोसले यांनी सांगितले.

 

वैधता प्रमाणपत्र तातडीने मिळावीतजात दाखल्यासोबत जातीचे वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय आरक्षित जागेवरील इच्छूकांचे नामनिर्देशन अर्ज न स्वीकारण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने इच्छूकांची वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरिता दमछाक होणार आहे. पुणे जिल्ह्यातील मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व २७१ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका २५ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्याकरिता तहसिलदारांच्या मार्फत सादर होणारे  जात वैधता प्रमाणपत्राचे अर्ज स्वीकारावेत व त्वरित त्यावर निर्णय घ्यावा असे पत्र पुणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी विभागीय जात पडताळणी समिती सचिवांना दिले आहे. पडताळणी समितीनेदेखिल तातडीने दाखल प्रकरणांवर निकाल द्यावा अन्यथा निम्म्याहून अधिक आरक्षित जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. तसेच नव इच्छूकांना जात वैधता प्रमाणपत्रा अभावी निवडणूक प्रक्रियेपासून वंचित रहावे लागणार असल्याने पडताळणी समितीने नामनिर्देशन दाखल करण्याच्या विहित कालावधीपर्यत सदरची दाखल प्रकरणे निकाली काढावीत अशी मागणी तालुक्यातून जोर धरु लागली आहे.

टॅग्स :mavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsarpanchसरपंच