शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून सव्वा कोटीचा अपहार, दोघांना अटक, खडकी पोलिसांकडे गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 03:57 IST

गोपनीय पासवर्डचा वापर करून सत्संग भवन खडकी परिसरातील विविध बँकांच्या १७ एटीएममधून सुमारे एक कोटी ३५ लाख ३४ हजार ७०० रुपये रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.

पिंपरी : गोपनीय पासवर्डचा वापर करून सत्संग भवन खडकी परिसरातील विविध बँकांच्या १७ एटीएममधून सुमारे एक कोटी ३५ लाख ३४ हजार ७०० रुपये रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. एटीएम केंद्रात सेवा पुरविणाºया कंपनीशी संबंधित कर्मचाºयांनी या रकमेचा अपहार केला असून दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेशकुमार पिल्ले (वय ३९, रा. ठाणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी सेक्युरी ट्रान्स अंडिया प्रा. लि. दिल्ली या कंपनीत एटीएम आॅपरेशन्स म्हणून काम करतात. तर अभिजीत संजय गोसावी (वय २१, लाखेवाडी, इंदापूर), अविनाश अशोक कांबळे (वय ३४,रा. औंध) या दोन आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी पिल्ले यांनी कंपनीच्या या कंपनीतर्फे सेवा पुरविण्यात येणाºया खडकी पुणे येथील एटीएम केंद्रांची आॅडिटरमार्फत माहिती घेतली असता, त्या शाखेत काम करणाºया कामगारांनी २१ पैकी १७ एटीएम केंद्रांवर पासवर्डचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले. शिनू राजकुमार सिंधू सालादल्लू (रा. पिंपळे गुरव) याच्याशी संगनमत करून दोन कर्मचाºयांनी मोठ्या रकमेचा अपहार केला असल्याचे फिर्यादीने पोलिसांना कळविले आहे.हॉटेलातील कार्ड स्वाईप यंत्राचा दुरूपयोगपिंपरी : हॉटेलचे बिल अदा करताना स्वाईप मशिनवर के्रडिट अथवा डेबिट कार्डचा वापर केल्यानंतर तेथील कामगार ग्राहक ज्या वेळी कार्डचा पासवर्ड दाबतो, त्या वेळी लक्ष ठेवून नंतर काही वेळाने हा पासवर्ड क्रमांक कागदावर लिहून ठेवतात. नंतर त्या क्रमांकाच्या आधारे गोपनीय माहिती मिळवून दुरुपयोग करतात. असाच प्रकार हिंजवडीत शनिवारी घडला असून, विकी रामअवतार अगरवाल (वय ३६, रा. कोंढवा, पुणे) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पाटील (वय ३७, रा. हिंजवडी) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. हिंजवडीतील शिवाजी चौकात एका हॉटेलात येणाºया ग्राहकांचे डेबिट आणि के्रडिट कार्डचे पासवर्ड क्रमांक हॉटेलच्या गल्ल्यावर रोखपाल म्हणून काम करणाºया कर्मचाºयाने लिहून ठेवले. केवळ ग्राहकच नाही तर हॉटेलमध्ये काम करणाºया सहकारी कर्मचाºयांचेही डेबिट, क्रेडिट कार्डचे क्रमांक त्याने लक्ष देऊन मिळविले.ग्राहक ज्या वेळी मशिनमध्ये डेबिट, क्रेडिट कार्ड ठेवून पासवर्ड क्रमांक देतात. त्या वेळी लक्ष देऊन रोखपाल ग्राहक कोणते क्रमांक दाबतो, हे लक्षात ठेवतो. थोड्या वेळाने हे क्रमांक तो दुसºया वहीत लिहून ठेवतो. नंतर या क्रमांकाच्या आधारे ग्राहकांची गोपनीय माहिती मिळवून ती अन्य ठिकाणी वापरून त्याने अनेकांची फसवणूक केली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आरोपीविरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या