शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Chinchwad By Election | ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन भोसलेंसह १६ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 19:15 IST

हाणामारीचा हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहा या कालावधीत थेरगाव येथे घडला...

पिंपरी :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हाणामारीचा हा प्रकार बुधवारी (दि. २२) सायंकाळी साडेपाच ते सहा या कालावधीत थेरगाव येथे घडला.

ॲड. सचिन भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयदीप संपत माने (वय ४०), आकाश हेगडे (वय ३१), सनी चव्हाण (वय २३), करण अहीर (वय २५), अक्षय कास्तार (वय २५, सर्व रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यातील आकाश हेगडे आणि सनी चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले हे बुधवारी (दि. २२) सायंकाळी साडेपाच ते सहा या कालावधीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा राग मनात धरून भाजपचे कार्यकर्ते जयदीप माने, आकाश हेगडे, सनी चव्हाण, करण अहीर, अक्षय कास्तार यांनी संगनमताने फिर्यादी भोसले यांचा रस्ता अडवला. त्यावेळी बाजूला सरण्यास हात केल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी भोसले यांच्या सोबतचे कार्यकर्ते गोरक्षनाथ पाषाणकर यांनाही दुखापत केली व शिवीगाळ करून जखमी केले. 

याच्या परस्पर विरोधात आकाश बापू हेगडे (वय ३१, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सचिन भोसले, त्यांची पत्नी, मुलगा, चुलती तसेच भोसले यांचा बाॅडीगार्ड व त्यांचे पाच ते सहा कार्यकर्ते यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास थेरगाव येथे असताना सचिन भोसले हे त्यांच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांसह आले. त्यांनी फिर्यादीला त्यांच्या प्रचाराचा साऊंडचा आवाज का कमी करायला सांगितला, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले.

टॅग्स :PuneपुणेShiv Senaशिवसेनाchinchwad-acचिंचवडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड