शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मजूर सुरक्षेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना:श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:37 IST

पाऊस सुरू झाल्यापासून पुण्यात गेल्या दोन आठवड्यांत इमारत कोसळून अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देबीट निरीक्षकांकडून तपासणी क्रेडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना आवाहन धोकादायक वाडा मालकांना नोटीसपावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील धोकादायक इमारती वाड्यांचे केले सर्वेक्षण

पिंपरी : पावसाळ्यात बांधकाम प्रकल्पांवर अपघात घडू नयेत, म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी क्रेडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना दक्षता घेण्याबाबत पत्र दिले आहे. ‘पावसाळ्यात बांधकाम प्रकल्प आणि बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. तसेच अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नयेत, याबाबत विभागवार बीट निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश दिले असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.पाऊस सुरू झाल्यापासून पुण्यात गेल्या दोन आठवड्यांत इमारत कोसळून अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आयुक्तांनी याबाबत पत्रक जारी केले आहे. आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘एखादी घटना घडल्यानंतर दक्षता घेण्यासाठी आवाहन करण्यापेक्षा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने धोकादायक वाडे, इमारती मालकांना नोटीस दिल्या आहेत. क्रेडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना आवाहन केले आहे. ज्या भागात बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प सुरू आहेत. त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.पावसाळ्यात अनधिकृतपणे बांधकामे करण्याबाबत लोक घाई करीत असतात. परवानगी घेऊन बांधकाम करणारे लोकांनीही पावसाळ्यात काम सुरू ठेवल्यास दक्षता न घेतल्यास अशा वेळी अपघाताची शक्यता असते.’’........धोकादायक वाडा मालकांना नोटीस ‘‘पावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील धोकादायक इमारती वाड्यांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार धोकादायक इमारत मालकांना नोटीस दिल्या आहेत. नागरिकांनी धोकादायक वाडे, काढून घेणे अपेक्षित असते. धोकादायक इमारती काढून घ्याव्यात, अशा सूचना केल्या आहेत. याबाबत नागरिकांनी कार्यवाही न केल्यास महापालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाणार आहे,’’ असे हर्डीकर यांनी सांगितले.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBuilding Collapseइमारत दुर्घटनाshravan hardikarश्रावण हर्डिकर