पिंपरी : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव एसयूव्ही कार दुपारी सांगवी येथील फेमस चौकातील हॉटेलमध्ये घुसून ओमप्रकाश पंदीनवार (६०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले. कारचालक सचिन जाधव हाही जखमी झाला.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. ओमप्रकाश पंदीनवार, त्यांची पत्नी सुवर्णा आणि नातू अनंत हे अनंत भोजनालय या हॉटेलमध्ये बसलेले होते. दुपारी अचानक रस्त्यावरून भरधाव कार थेट हॉटेलचे शटर तोडून आत शिरली. कारची धडक बसून गंभीर जखमी झाल्याने ओमप्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला. हॉटेलातील कामगार बसवराज तळपदे (५०) यांना गंभीर दुखापत झाली. ओमप्रकाश यांची पत्नी व नातू जखमी झाला.
भरधाव कार हॉटेलात घुसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:01 IST