शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

रद्द केलेली प्रगती एक्सप्रेस पुन्हा धावणार; रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड चा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 19:40 IST

प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत ही गाडी येत्या ११ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे...

चिंचवड: नैसर्गिक आपत्तीमुळे खंडाळा घाट सेक्शनची भयंकर दुरावस्था झाली असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने दिड महिन्यांपासून खंडाळा घाट सेक्शनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असुन सदर काम सुमारे चार ते पाच महिने सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा न येण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द केलेल्या आहेत यात प्रगती एक्सप्रेस चाही समावेश करण्यात आला होता.मात्र नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही गाडी पुन्हा सुरू करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाने केली होती.प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत ही गाडी येत्या ११ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. सुमारे दहा ते बारा मेल एक्सप्रेस गाड्या रद्द केल्यामुळे पुणे, कोल्हापूर, भुसावळ, नांदेड, हुबळी, पनवेल, मुंबई इत्यादी दिशेकडुन येणा-या व जाणा-या प्रवाशांचे भयंकर हाल होत आहेत. तसेच पुणे दिशेकडुन पनवेल दिशेकडील नवी मुंबई, वाशी, बेलापुर, ठाणे इत्यादी ठिकाणी शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयांतील कर्मचारी वर्गास पनवेल मार्गे एकही मेल एक्सप्रेस गाडी सुरु नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात शारीरिक, मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याने रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड यांनी पुणे मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस गाडी पुन्हा सुरु करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. प्रगती एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष व सर्व सदस्य मागील पंधरा दिवसांपासुन मध्य रेल्वे प्रशासनातील संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गांच्या भेटीगाठी घेऊन प्रगती एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याबाबत प्रयत्न करत होते.प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे धावत असल्यामुळे पनवेल, बेलापुर, वाशी, ठाणे इत्यादी ठिकाणी शासकीय व खाजगी क्षेत्रात काम करणा-या रेल्वे प्रवाशांना लाभ होईल व त्यांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास कमी होईल तसेच संसार प्रपंच सांभाळुन तारेवरची कसरत करुन पुण्यावरुन पनवेल, मुंबई दिशेला नोकरी, व्यवसायानिमित्त येणा-या महिला प्रवाशांनाही प्रगती एक्सप्रेस सुरु झाल्यास घरी जाण्यास रात्री उशिर होणार नाही व त्या सर्व महिला वेळेत घरी पोहचतील.अशा अनेक बाबी रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष व सदस्य रेल्वेच्या अधिका-यांची व मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे ह्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणुन देत होते. अखेर, रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याचे संघाच्या पदाधिका?्यांनी कळविले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस ही गाडी दिनांक ११ नोव्हेंबर पासुन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रगती एक्सप्रेस सुरु होईपर्यंत डेक्कन क्विन ह्या गाडीला कर्जत रेल्वे स्थानकात एक मिनिटांचा थांबा दिला जाईल असेही कळविले आहे. प्रगती एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याबाबत रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष ईक्बाल भाईजान मुलाणी, उपाध्यक्ष शैलेंद्र पांडेय, सदस्या तथा महिला अध्यक्षा भारती कोळमकर, सदस्य प्रदिप जाधव, यादव बोरले, कोमल भावसार, गौतम मोरे, गोंविद नाईक, दिपक शेगर ह्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. पुणे मुंबई प्रवास करणा-या हजारो रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष व सर्व सदस्यांचे मन:पुर्वक आभार मानले आहेत.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेpassengerप्रवासी