शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अर्थसंकल्प तासाभरात मंजूर

By admin | Updated: February 27, 2016 04:34 IST

आगामी आर्थिक वर्ष २०१६-१७साठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा अर्थसंकल्प (बजेट) शुक्रवारी नगराध्यक्षा माया भेगडे यांच्या अध्यक्षतेखालील नगर परिषद सभागृहातील

तळेगाव स्टेशन : आगामी आर्थिक वर्ष २०१६-१७साठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा अर्थसंकल्प (बजेट) शुक्रवारी नगराध्यक्षा माया भेगडे यांच्या अध्यक्षतेखालील नगर परिषद सभागृहातील विशेष सभेत तासाभरात मंजूर करण्यात आला.आगामी आर्थिक वर्षात ९४ कोटी ४५ लाख १८ हजार ६४४ रुपये विविध मार्गाने पालिकेच्या तिजोरीत जमा होणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. विविध कामांसाठी ९४ कोटी ४४ लाख ७४ हजार रुपये खर्चाची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाशी तुलना करता, यंदा २७ कोटी ६२ लाखांची आवक कमी होणार असून, होणारा खर्चही १३ कोटी ६० लाख रुपयांनी कमी केल्याचे दिसते. विरोधी बाकावरील नगरसेवकांनी या अंदाजपत्रकामध्ये भांडवली खर्च ६७ कोटी, तर भांडवली जमा केवळ ४६ कोटी असा तब्बल २१ कोटींचा फरक असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी कैलास गावडे यांनी खुलासा करून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, नगरसेविका सुलोचना आवारे, शालिनी खळदे, तनुजा जगनाडे, सुनंदा मखामले, तसेच नगरसेवक सत्येंद्रराजे दाभाडे, गणेश काकडे, किशोर भेगडे, सुरेश धोत्रे, चंद्रभान खळदे, नितीन पवार आदी मंडळी सत्ताधारी पक्षातर्फे आणि विरोधी पक्षनेते सुनील शेळके, नगरसेविका सुजाता खेर, अमृता टकले, शुभांगी शिरसाट, नगरसेवक गणेश भेगडे, सुशील सैंदाणे, चंद्रकांत शेटे आदी विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित होते. अंदाजपत्रकाचे वाचन पालिकेचे अंतर्गत लेखापरीक्षक कणसे यांनी केले. काही नगरसेवकांनी केलेल्या सूचनांचा विचार करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी गावडे यांनी दिल्यानंतर सभागृहाने अंदाजपत्रक तासाभराच्या आतच मंजूर केले. (वार्ताहर)अंदाजपत्रकात सन २०१६-१७ साठी आरंभीची शिल्लक १४ कोटी दाखविली आहे. याचाच अर्थ गतवर्षी १४ कोटींच्या विकासकामांचे नियोजन करण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत.अर्थसंकल्प मांडणीचा मसुदा सदोष वाटतो. भिंग लावूनही तो वाचता येईल का नाही इतका अस्पष्ट आहे. सन २०१२-१३, १३-१४, १४-१५, १५-१६ आणि १६-१७च्या गुंतागुंतीच्या आकडेवारीची सरमिसळ केली आहे. रकमा रुपयांत, पैशांत, हजारांत, लाखात याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. रकमांचा स्पष्ट उल्लेख नसेल, तर नियमाप्रमाणे तो ग्राह्य धरता येणार नाही. या संदर्भात लेखापालांचा सल्ला घेण्याची गरज आहे. जमा-खर्चातील घट पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ कोटी ६२ लाख रुपयांची घट व खर्चाच्या बाजूत १३ कोटी ६० लाख रुपयांची घट असल्याने हा अर्थसंकल्प विकासाचा घसरता आलेख दर्शविणारा ठरू शकेल.जमेच्या ठळक बाबी बाल्कनी बंद करणे व पेड एफएसआय : ६ कोटी रुपये, व्याज : १ कोटी ७४ लाख, ५० हजार.शिक्षण उपकर : १.५ कोटी वृक्षाकर : ३४ लाख ५१ हजार खर्चाच्या ठळक बाबी पाणीपुरवठा वीजबिल : ३ कोटी रुपये, नाट्यगृह उभारणी : १ कोटी १० लाख, पथदिवे वीजबिल : ८० लाख, घनकचरा व्यवस्थापन : ५० लाख, जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती : २० लाख, शिक्षण मंडळ अनुदान : २० लाख, मोकाट जनावरांचा बंदोबस्त : १२ लाख, कायदेविषयक फी आणि दावे खटले : १० लाख, छत्रपती शिवाजीमहाराज जयंती : ५ लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : ५ लाख, झोपडपट्टी पुनर्वसन : ५ लाख, नगराध्यक्ष मानधन व वाहनभत्ता ३ लाख, प्राथमिक शिक्षण : २ लाख. पालिकेचे हे अंदाजपत्रक फुगवटाविरहित असून,करवसुली कमी दिसत असली, तरी गेल्या आर्थिक वर्षाची तुलना करता ती चांगली आहे.मार्चअखेर ती ८० टक्के होईल, अशी आशा आहे.- माया भेगडे, नगराध्यक्षाबॅँकेतील ठेवी, तत्सम मार्गातून व्याजापोटी मिळणाऱ्या उत्पन्नापोटी आगामी वर्षात सुमारे पावनेदोन कोटी रुपये व्याजापोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट अंदाजपत्रकात दाखवले आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. परंतु, नगर परिषद ही काही बँक किंवा नफेखोरी करणारी संस्था नाही.त्यामुळे ठेवींबाबत पुनर्विचार गरजेचा आहे. २५ ते ३० कोटींच्या ठेवी कायमस्वरूपी बॅँकेत ठेवणारी तळेगाव नगरपालिका राज्यात एकमेव असेल, तर ते अभिनंदनास पात्र नाही. ठेवींच्या रकमेची विकासकामांसाठी तरतूद करणे गरजेचे आहे.- सुनील शेळके, विरोधी पक्षनेते