शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

बीआरटीची यंत्रणा कुचकामी; प्रवाशांना भोगावा लागतोय त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 18:23 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून बीआरटी मार्ग प्रवाशांसाठी असुरक्षित तसेच धोकादायक

ठळक मुद्देनियंत्रण यंत्रणाच बंद पडलीबसथांब्याचे दरवाजे धोकादायक; अपघाताची शक्यता चिंचवड स्टेशन ते कासारवाडी या रस्त्यावरील बीआरटीचा रस्ता झाला पूर्णपणे बंद

पिंपरी : जलद गतीने बस प्रवास होण्यासाठी पीएमपीएलने पिंपरी-चिंचवड व पुणे शहरामध्ये बीआरटी मार्ग सुरू केले आहेत. पण या बीआरटी मार्गावरच्या थांब्याची स्थिती चांगली नाही. या मार्गावर धावणाऱ्या बसवर पीएमपीच्या नियंत्रण कक्षातून नियंत्रण ठेवले जात होते. पण ती यंत्रणाच बंद पडल्याने हे काम ठप्प झाले आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून बीआरटी मार्ग प्रवाशांसाठी असुरक्षित तसेच धोकादायक ठरत आहेत. दापोडी ते निगडी मार्गातील सर्व बस थांब्याचे दरवाजे सताड उघडे असल्याने प्रवासी धोकादायक पद्धतीने बसची वाट पाहत उभे राहत असतात. स्थानकांवर बसची माहिती देणारे डिजिटल फलक बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसची माहिती मिळत नाही. बस थांब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविले आहेत. पण ही यंत्रणा बंद असल्याने दरवाजे सताड उघडे असतात. बस येण्यापूर्वी प्रवासी या ठिकाणी धोकादायक पद्धतीने बसची वाट पाहत असतात. हा दरवाजा रस्त्यापासून काही फूट उंच आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तिथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा निर्माण केलेल्या नाहीत. थांब्याच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. थांब्याची स्वच्छताही केली जात नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत मेट्रोच्या सुरू असणाऱ्या कामामुळे चिंचवड स्टेशन ते कासारवाडी या रस्त्यावरील बीआरटीचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. या मार्गावर धावणाऱ्या बसचे उत्पन्न इतर मार्गावरील बसच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. प्रवाशांकडूनही या मार्गांना चांगला प्रतिसाद मिळतो. पण मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. खासगी वाहनांना बीआरटी रस्त्यावर जाण्यासाठीचा मार्ग सहजपणे उपलब्ध झाला आहे. या रस्त्यावरील बीआरटी लेनमध्येच घुसणाºया वाहनांमुळे पीएमपीच्या बसना अडथळा निर्माण होत आहे. मेट्रोचे काम चालू आहे त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली असते. मार्गामध्ये होणारी इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यात अपयश येत आहे. त्यामुळे बीआरटी बसचा वेगही मंदावला रस्त्यावर, फुटपाथवर होणारी अतिक्रमणे कोणी काढायची. या अतिक्रमणामुळे वाहतूककोंडी सर्रास होते आहे. अतिक्रमण विभागाशी ‘सेटिंग’ असल्याच्या थाटात अतिक्रमणकर्ते मिरवतात. फुटपाथवर खंडणी गोळा करत आपला उदरनिर्वाह करणारे भाई गल्लीबोळात बोकाळले आहेत. त्यांच्या मुसक्या कोण आवळणार, या शहरात काहीच घडणार नाही का, असा निराशेचा सूर नागरिकांमध्ये पसरवण्यास कारणीभूत ठरलेल्या आणि वाहतूककोंडी वाढवणाºया छोट्या-मोठ्या गोष्टी कोण रोखणार, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे...............निवेदन : समस्या सोडविण्याची मागणीपिंपरी : शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था सुधारावी म्हणून ‘बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टिम’अर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले. यातील काही मार्गांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी या मार्गांची दुरुस्ती करून येथील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी केली आहे. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता रवींद्र सूर्यवंशी यांच्याकडे कस्पटे यांनी निवेदन दिले आहे. काळेवाडी फाटा ते डांगे चौक दरम्यानच्या बीआरटीएस मार्गाची पाहणी करण्यात आली. बीआरटी मार्गावरील मार्गदर्शक फलकांची दुरवस्था झाली आहे तर काही फलक गायब झाले आहेत. या मार्गांवर अतिक्रमण झाले आहे, सुरक्षारक्षक नियुक्त नसतात, वाहनतळाची समस्या आहे, आदी बाबी या पाहणीदरम्यान समोर आल्या. बीआरटीएस मार्ग डीपीआरप्रमाणे झालेला नाही. या मार्गावर सायकल ट्रॅक, पदपथ अस्तित्वात नाहीत, वृक्षलागवड करण्यात आलेली नाही, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे अपघाताचा धोका आहे. या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. बीआरटीएस मार्गावरील समस्या सोडविण्यासाठी आठ दिवसांत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सूर्यवंशी यांनी या वेळी दिले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात