शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

बीआरटीएस बसअभावी कोलमडतेय वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 02:33 IST

अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांची गैैरसोय

- मंगेश पांडे पिंपरी : जलद प्रवासी वाहतुकीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल)निगडी ते दापोडी या मार्गावर बीआरटी सेवा सुरू केली. मात्र, निगडी आगारातून १५ मार्गांसाठी सोडण्यात येणाºया बीआरटी बसची संख्या अपुरी असल्याने या मार्गावरून धावणाºया बसचे वेळापत्रक कोलमडत आहे. निगडी-दापोडी मार्गिकेसाठी २०० बसची आवश्यकता असताना सध्या केवळ १७२ बस सोडल्या जात असून, आणखी २८ बसची प्रतीक्षा आहे.पीएमपीने निगडी ते दापोडी, किवळे ते सांगवी, नाशिक फाटा ते वाकड, संगमवाडी ते विश्रांतवाडी, तसेच येरवडा ते वाघोली या पाच मार्गांवर बीआरटी सेवा सुरू केली. या मार्गिकेतून धावणाºया बसमधून चढ-उतार करण्यासाठी उजव्या बाजूला बसथांबे उभारले असून, बसही उजव्या बाजूला दरवाजा असलेल्याच असणे आवश्यक असतात. जुन्या पद्धतीच्या केवळ डाव्या बाजूला दरवाजा असलेल्या बस या मार्गिकेतून धावू शकत नाहीत. दरम्यान, बीआरटीएस बसची संख्या अपुरी असल्याने अनेकदा ठरावीक वेळेत बस मार्गावर सोडणे शक्य होत नाही. यामुळे बसचे वेळापत्रक कोलमडत असून,प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे दिसून येते.इतर मार्गांवर डाव्या बाजूला दरवाजा असलेल्या बस सोडल्या जातात. एखाद्या मार्गावरील बस बंद असल्यास दुसरी बस सोडली जाते. मात्र, बीआरटीएस मार्गिकेतून सोडण्यासाठी उजव्या बाजूला दरवाजा असलेलीच बस आवश्यक असते. दरम्यान, उजव्या दरवाजाची बस आगारात उपलब्ध नसल्यास वेळापत्रकात ठरवून दिलेल्या वेळेत बस पाठविणे शक्य होत नाही. अनेक मार्गांवरील बसच्या फेºया केल्याकमी बीआरटीएस बसची संख्या अगोदरच कमी असताना बस बंद पडणे, स्वयंचलित दरवाजा न उघडणे या गोष्टींचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे निगडी-दापोडी मार्गासाठी १७२ बस असल्या, तरी दररोज त्यातील सरासरी केवळ १६५ बस धावत असतात. यामुळे अनेक मार्गांवरील बसच्या फेºयाही कमी करण्यात आल्या आहेत. निगडी ते वारजे माळवाडी, निगडी ते हडपसर, निगडी ते कात्रज या वायसीएममार्गे असलेल्या बसच्या फेºया कमी केल्या असून, त्यामुळे निगडीतून वायसीएममार्गे तब्बल अर्धा ते पाऊण तास कालावधीनंतरही बस मिळत नाही. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.सुरळीत सेवेसाठी २०० सुसज्ज बसची गरजनिगडी-दापोडी या बीआरटीएस मार्गिकेतून अपर डेपो, कोथरूड डेपो, मनपा, कात्रज, हडपसर, पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, वाघोली, पुणे स्टेशन (औंधमार्गे) आदी १५ मार्गांच्या बस धावतात. या मार्गांवर धावण्यासाठी निगडी आगारातून १७२ बस सुटतात. यातीलही अनेक बस बंद असतात. दरम्यान, सध्याच्या १७२ बसही अपुºया पडत असून आणखी २८ बस आवश्यक आहेत. एकूण २०० सुसज्ज बस असल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले.बीआरटीच्या केवळ ५२० बस उपलब्धपीएमपीच्या १३ आगारांमधून पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटीएस मार्गिकेतून धावण्यासाठी ९०० बसची आवश्यकता असताना सध्या केवळ ५२० बस आहेत. ही संख्या अपुरी असून यामध्ये आणखी ३२० बसची आवश्यकता आहे. पुरेशा बस असल्यास सर्व बीआरटीएस मार्गांवर वेळेत बस सोडणे शक्य होणार असल्याचे बीआरटीएसच्या अधिकाºयांनी सांगितले.पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील ५ बीआरटीएस मार्गिकेतून सध्या धावणाºया बस - ५२०सुरळीत सेवेसाठी पुणे व पिंपरीसाठी अपेक्षित एकूण बस - ९००निगडी ते दापोडी मार्गिकेतून सध्या धावणाºया बस - १७२निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर अपेक्षित एकूण बस - २००

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड