शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

‘बीआरटी’ला अखेर २४ आॅगस्टचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 03:13 IST

दापोडी ते निगडी बीआरटी मार्गाचे ‘सेफ्टी आॅडिट’ झाल्यानंतर उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे.

पिंपरी : दापोडी ते निगडी बीआरटी मार्गाचे ‘सेफ्टी आॅडिट’ झाल्यानंतर उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने २४ आॅगस्टपासून दहा वर्षांपासून प्रलंबित असणारी बीआरटी सुरू करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी बीआरटी प्रकल्प राबविण्याचे नियोजन झाले. प्रमुख मार्गांवर बीआरटी सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी २००९ला सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य वाहिनी असणाऱ्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी-निगडी या बीआरटी मार्गाचे नियोजन केले होते. मात्र, एकाच मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी आणि सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र मार्ग असल्याने या मार्गावर बीआरटी यशस्वी होणार नाही, असा दावा न्यायालयात दाखल झाला होता. तसेच अ‍ॅड़ हिंमतराव जाधव यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार पहिल्याच बीआरटी मार्गाचे नियोजन फसल्याने निगडी-दापोडी मार्ग रखडला होता. गेल्या नऊ वर्षांत अनेकदा या मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त काढला. मात्र, उद्घाटन झालेच नाही. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेची सूत्रे हाती घेताच बीआरटी मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तसेच आयआयटी, पवईकडून सेफ्टी आॅडिट झाले. स्वयंचलित यंत्रणा, सुरक्षेच्या उपाययोजना, ग्रेड सेपरेटर, बीआरटी मार्ग आणि इतर वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग असे एकात एक मार्ग असल्याने सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन केले आहे. या मार्गावरील बस टर्मिनल, थांबे यांचे कामही पूर्ण झाले आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, मर्ज इन आणि मर्ज आऊट येथे अपघात होणार नाहीत. क्रॉसिंग आणि चौकांच्या ठिकाणीही अपघात होणार नाही याचीही दक्षता घेतली होती.दापोडी-निगडी बीआरटी मार्ग शुक्रवारी सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील नियोजन पूर्ण झाले आहे. पीएमपीने बसचे नियोजन केले आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील बस टर्मिनसचेही उद्घाटन होणार आहे. बीआरटी मार्गावर सेवा सुरू करून दोन महिन्यांचा अहवाल सादर केला जाणार आहे. सुरक्षाविषयक आणखी काही सूचना केल्यास त्याची उपाययोजना केली जाणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड