शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स सभांना ब्रेक,स्थायीसह विविध समितीच्या सभा पूर्वीप्रमाणेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 16:59 IST

सर्वसाधारण सभेबाबत गोंधळ सुरूच

पिंपरी : कोरोनामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरु असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध समितीच्या सभा नियमितपणे घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेबाबत कोणतेही शासनादेश न आल्याने सर्वसाधारण सभांचे काय होणार असा प्रश्न आहे.

मेट्रो सिटींमध्ये कोरोनाचा आलेख वाढत असल्याने महापालिकांच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याच्या सूचना राज्य शासनाने केल्या होत्या. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांपासून या सभा होत होत्या. डिसेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नियमित सभा घेण्यास या कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊ लागल्याने राज्याचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी नवीन आदेश दिला आहे. त्यात नियमितपणे स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सभा नियमितपणे घेण्यास मान्यता दिली आहे...........विविध समिती सभेसाठी नियमृ१)  आरोग्य विषयक निकष, कोवीड-१९ संदभार्तील विहीत कार्यपध्दती पालन करणे गरजेचे आहे.२) बैठकांमध्ये मास्कचा वापर, योग्य शारिरीक अंतर ठेवणे, हातांची स्वच्छता, सर्दी व खोकताना घ्यावयाची काळजी घेणे आवश्यक आहे.३) बैठकीसाठी पुरेशी मोकळी हवेशीर जागा, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.४) तसेच बैठकीच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावर बैठक व्यवस्था करुन सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.....................स्थायी समितीसह विविध विषय समितीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेतली जात होती. या सभा पूर्वीप्रमाणे घेण्यास राज्य शासनाने सूचविले आहे. त्यानुसार नियमांचे पालन करून सभा घेण्यात येईल.-उल्हास जगताप, नगरसचिव....................................सर्वसाधारण सभांबाबत अनिश्चितताशासनाने दिलेल्या सभांविषयीच्या नवीन आदेशात सर्वसाधारण सभेविषयी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. सध्या ही सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली जाते. पुढील सभा २० जानेवारीला आहे. विशेष सभेचे नियोजन महापालिका करीत आहे. त्यामुळे सभेचे काय होणार? याबाबत अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्या