शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा नगरपरिषदेच्या नोटिसीचा अपहार करुन सोसायटीला बजावल्या बोगस नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 20:30 IST

लोणावळा नगरपरिषदेच्या नोटिसची चोरी करुन त्या नोटिसची झेराॅक्स काॅपी तयार करत त्यावर अतिक्रमन निर्मुलन अधिकारी यांची बनावट सही करत वलवण येथील दर्शन व्हॅली या सोसायटीमधील काही बंगले धारकांना नोटीस बजावण्याचा महाप्रताप काही मंडळींनी केला आहे.

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या नोटिसची चोरी करुन त्या नोटिसची झेराॅक्स काॅपी तयार करत त्यावर अतिक्रमन निर्मुलन अधिकारी यांची बनावट सही करत वलवण येथील दर्शन व्हॅली या सोसायटीमधील काही बंगले धारकांना नोटीस बजावण्याचा महाप्रताप काही मंडळींनी केला आहे. हा सर्व प्रकार समोर येताच लोणावळा नगरपरिषदेचे अतिक्रमण निर्मुलन अधिकारी नेताजी पवार यांनी मुख्याधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा मात्र नोंद करण्यात आला नव्हता.      लोणावळा नगरपरिषदेच्या नावे बंगलेधारक, सोसायटीधारक यांनी धमकावत पैसे गोळा करणार्‍या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. याप्रकरणी लोकमतने आवाज उठवत नगरपरिषदेला दलालांचा विळखा हे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर काही दिवस हे प्रकार थांबले होते. मात्र काल नव्याने समोर आलेल्या नोटीस चोरीच्या प्रकरणाने या प्रकारांना वेगळे वळण लागले असल्याची चर्चा सुरु आहे.       वलवण येथील दर्शन व्हॅली या सोसायटीमधील काही बंगल्यांना आपण मंजूर नकाशापेक्षा वाढीव काम केले असल्याचे आढळून आले आहे. वाढीव कामाला मंजूर घेतली असल्यास सदर कामाची कागदपत्रे कार्यालयात सादर करा अन्यथा तातडीने सात दिवसाच्या आत ते बांधकाम काढून टाकावे अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलमान्वे कारवाई करण्यात येईल असा मजकूर असलेली नोटीस मा. चेअरमन दर्शन व्हॅली हाऊसिंग सोसायटी या नावाने बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसा बजावत काही मंडळींनी बंगलरधारकांकडून कारवाई टाळण्यासाठी विशिष्टय रक्कम ठरवून घेतली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. याबाबत सोसायटीमधील एका व्यक्तीने सदर नोटीस नगरपरिषदेत दाखविल्यानंतर सदर नोटीस व त्यावरील अतिक्रमण निर्मुलन अधिकारी यांची स्वाक्षरी बोगस असल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले. तसेच अशा प्रकारे कोणाला नोटिसा आल्या असल्यास त्यांनी नगरपरिषदेत येऊन शहनिशा करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.