शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णीस कारणीभूत असणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका, डॉ. रॉय यांना निलंबित करा; महापौरांचा आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 00:17 IST

शहराच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मैलापाणी, नाल्यांमधील प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णीच्या विस्तारासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन नदीचा नैसर्गिक समतोल ढासळत असून जलजीवसृष्टीवरही दुष्परिणाम जाणवत आहेत.

पिंपरी : पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीतील जलपर्णीमुळे डासांचा त्रास वाढला आहे. कोटयवधी रुपये खुर्चुनही जलपर्णी तशीच आहे. याबाबत सत्ताधारी भाजप आक्रमक झाली आहे. जलपर्णीस कारणीभूत असणा-या ठेकेदारास काळया यादीत टाकावे, आरोग्य प्रमुख डॉ. अनिल रॉय यांना निलंबित करावे, असे आदेश महापौर उषा ढोरे यांनी आयुक्तांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी असून  बेसुमार जलपर्णी वाढलेली आहे. शहराच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मैलापाणी, नाल्यांमधील प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णीच्या विस्तारासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन नदीचा नैसर्गिक समतोल ढासळत असून जलजीवसृष्टीवरही दुष्परिणाम जाणवत आहेत. नदीतील जलपणीर्मुळे शहरातील सर्व नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नदीपात्र जलपणीर्ने व्यापले असून महानगरपालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. नदी पात्रातील जलपर्णी काढण्याबाबत ठेकेदाराचे हलगर्जी व निष्काळजीपणा करीत असल्याची तक्रार माजी महापौर राहुल जाधव यांनी सर्वसाधारण सभेत केली होती.याबाबत आज सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले होते. महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई घुले आदी उस्थित होते.महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ‘‘शहरातील नद्यामधील जलपर्णी काढण्याचे काम हे एकाच ठेकेदारास देण्यात आले असून  ठेकेदार कोणतेही काम न करता आणि जलपर्णी न काढता पावसाळ्याची वाट पाहतो. पूरांच्या पाण्यामुळे जलपर्णी वाहून जाते. व महापालिकेकडून सदर ठेकेदाराचे बिल देखील अदा करण्यात येत आहे.’’सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘‘ ठेकेदारावर व त्याचे कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे असताना देखील त्यांचेकडून अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणा होत आहे. नदीतील जलप्रदुषणाचा तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न विचारात घेऊन संबंधित अधिका-याचे तात्काळ निलंबन करण्यात येऊन संबंधित ठेकेदार हा जलपर्णी काढण्याचे काम व्यवस्थित करत नसल्याने मनपाचे आर्थिक नुकसान टाळण्याकरिता  ठेकेदारास काळया यादीमध्ये टाकून नद्यामधील जलपणीर्शी संबंधित कामाचे बील देऊ नये.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड