शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहरात गॅसचा काळाबाजार; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:56 IST

घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी गॅसचा काळाबाजार रावेतमध्ये उघडकीस आला असून छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा साठा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

ठळक मुद्दे८ बाय ८ जागेत घरगुती व कमर्शिअल वापराच्या गॅस सिलेंडरचा आढळून आला साठापुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत ओव्हाळ यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन केला पंचनामा

रावेत : घरगुती आणि व्यावसायिक कारणासाठी गॅसचा काळाबाजार रावेतमध्ये उघडकीस आला असून छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा साठा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील व पदाधिकारी बुधवार (दि. २१) रोजी रहाटणीकडून काळेवाडीकडे जात असताना सिद्धनाथ गॅस सर्व्हिस रहाटणी काळेवाडी रोड, या ठिकाणी घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर एका विना क्रमांकाच्या तीनचाकी टेम्पोमधून, सिद्धनाथ गॅस सर्व्हिस या दुकानात खाली करताना आढळले. तेव्हा हा गैरप्रकार असल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केली असता, रतन गॅस एजन्सी काळेवाडी यांचाकडील घरगुती सिलेंडर वितरणासाठी वापरणात येणारा टेम्पो हा या ठिकाणी घरगुती वापराच्या गॅसचा काळा बाजार करत असल्याचे लक्षात आले. दुकानात पाहणी केली असता ८ बाय ८ जागेत मोठ्या प्रमाणात घरगुती व कमर्शिअल वापराच्या गॅस सिलेंडरचा साठा आढळून आला. त्यावेळी छावा मराठा युवा महासंघ अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र यांनी १०० नंबरला फोन करून हा गैरप्रकार चालू असल्याचे कळवले. गणेश सरकटे पाटील यांनी पुरवठा विभाग अधिकाऱ्याला माहिती देऊन बोलावून घेतले. पिंपळे सौदागर चौकीत ड्युटीवरील पोलीस अधिकाऱ्याने मुद्देमाल जप्त करून चौकीत नेला. पुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत ओव्हाळ यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर-पाटील, राजेंद्र देवकर-पाटील, गणेश सरकटे-पाटील, सचिन आल्हाट, गौरव धनवे नाना फुगे, विजय लोट आदींनी सहभाग घेतला.छावा युवा मराठा महासंघाने घरगुती गॅसच्या पिंपरी चिंचवड शहर परिसरात होणाऱ्या काळ्या बाजाराबद्दल, १२ जानेवारी २०१८ रोजी पुरवठा विभाग व पोलीस प्रशासन (डीसीपी कार्यालय) यांना निवेदन देऊन या गैरप्रकारावर आळा घालण्याची विनंती केली होती. 

टॅग्स :rahatniरहाटणीSangviसांगवीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड