शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बंडोबांना थंड करण्यासाठी सरसावले पक्षश्रेष्ठी, भाजपातील राजीनामानाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 04:19 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदावरून भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे. राजीनामानाट्यही घडले. अध्यक्षपदाच्या बुधवारी होणाºया निवडणुकीत भोसरीकर कोणती भूमिका घेताहेत याकडे लक्ष लागले आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदावरून भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांनी बंडाचे निशाण फडकाविले आहे. राजीनामानाट्यही घडले. अध्यक्षपदाच्या बुधवारी होणाºया निवडणुकीत भोसरीकर कोणती भूमिका घेताहेत याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत बैठक घेणार आहेत. नाराजी दूर करून गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.आशिया खंडात श्रीमंत म्हणून लौकिक असणाºया पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या आपल्या हातात असाव्यात यासाठी सत्ताधारी राष्टÑवादी काँग्रेसप्रमाणेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी ‘शह-काटशहा’चे राजकारण पिंपरीत सुरू आहे. स्थायी समितीत अध्यक्षपदासाठी आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यापैकी कोणाच्या समर्थकाची निवड होणार याबाबत उत्सुकता होती. भोसरी विधानसभेला अध्यक्षपद मिळणार हे जवळ जवळ निश्चित झाले होते. मात्र, अध्यक्षनिवडीत भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनपेक्षितपणे बाजी मारली.राजीनामा माघारी घेणारभोसरीतील आमदारसमर्थक महापौर नितीन काळजे यांच्यासह राहुल जाधव, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे खळबळ माजली होती. भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर असे वृत्त प्रकाशित होताच त्याची दखल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. नाराजी दूर करण्यासाठी नेते सरसावले असून, त्यांनी दोन्ही गटांच्या नेत्यांशी चर्चा केली. महापौर नितीन काळजे यांच्यासह अन्य सदस्यांचा राजीनामा मंजूर केला जाणार नसल्याचे समजते.गायकवाडांवर शिक्कामोर्तबमाजी नगरसेवक विनायक गायकवाड यांची पत्नी ममता गायकवाड यांचा भाजपातर्फे अर्ज भरला. समर्थकांना डावलल्यामुळे आमदार महेश लांडगे यांचा गट प्रचंड नाराज झाला. त्यातूनच बंडखोरी होण्याची चिन्हे होती. आमदार समर्थकांनी राष्टÑवादीचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांना पाठिंबाही जाहीर केला होता. मात्र, नाराजांची समजूत काढण्यासाठी भाजपा नेते सरसावल्याने स्थायी समितीत भाजपाचे बहुमत असल्याने ममता गायकवाड यांच्या नावावर बुधवारी शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.

टॅग्स :BJPभाजपा