शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

रूग्णालय खासगीकरणास भाजपाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 20:16 IST

पिंपरी चिंचवड महानगरपालिकमार्फत भोसरी येथे उभारलेल्या रूग्णालय खासगीकरणास भाजपाने विरोध केला आहे.

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकमार्फत भोसरी येथे उभारलेल्या रूग्णालयाच्या खासगीकरणास भाजपाने विरोध केला आहे. आज सुमारे पाच हजार नागरिकांनी भोसरीत आंदोलन केले. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांसह विरोधीपक्षाने आयुक्तांना निवेदन दिले. खासगीकरणास विरोध दर्शविला. भोसरीतील रूग्णालयाच्या खासगीकरणास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. त्यापाठोपाठ भाजपातील एका गटानेही विरोध दर्शविला आहे. भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आले.

निलेश मुटके, शेखर लांडगे, भरत लांडगे, आशा लांडगे, संतोष लांडे आदी सहभागी झाले होते. त्यानंतर नगरसेवक रवी लांडगे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. या आंदोलनात भोसरीतील सर्वसामान्य नागरीकांसह शहारातील आधार सोशल फाऊंडेशन,वैष्णव विचार किर्तन महोत्सव समिती, नवशक्ती बालाजी ग्रुप, अखिल भारतीय छावा मराठी युवा संघटन, जय महाराष्ट कामगार सेना,महाराष्ट्र मजूर पक्ष, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, दलित स्वयंसेवक संघ इत्यादी  विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. रवी लांडगे म्हणाले, ‘‘आरोग्य वैद्यकीय सुविधा हि मनपाची मूलभूत सुविधा असून शहरातील गोरगरीब, झोपडपट्टीतील व सर्वसामान्य नागरीकांसाठी हि सुविधा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोतून अतिशय महत्वाची आहे. मनुष्यबळ नाही म्हणून खासगीकरण करणे योग्य आहे का? उद्या मनुष्यबळ नाही म्हणून महापालिका खासगी तत्वावर चालवायला देणार का?. खासगीकरणाने व्यावसायिक रूप प्राप्त होणार आहे.’’ 

दत्ता साने म्हणाले, ‘‘मनपाच्या वाय.सी.एम. रुग्णालयांमध्ये शहरातीलच नव्हे तर शहराबाहेरुन पुणे जिल्हातून रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. शहरामध्ये वाय.सी.एम.रुगणालयसह, तालेरा, जिजामाता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,भोसरी,आकुर्डी,यमुनानगर, इंदिरा गांधी, खिंवसरा पाटील, इत्यादी रुग्णालये सद्यस्थितीत कार्यरत असून ती समाधानकारक वैद्यकीय सुविधा शहरातील नागरीकांना पुरवित आहेत. शहरातील गोर गरीब नागरीकांना वैद्यकीय सुविधा पुरविणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्यच आहे. परंतु या हेतूलाच हरताळ फासला जात आहे. याआधी रुबी अल केअर खाजगी संस्थेमार्फत चालविण्यास दिले आहे. त्याचा अनुभव क्लेशदायक आहे. तसेच वाय.सी.एम. रुग्णालयात लवकरच पदवीव्युतर अभ्यासक्रम चालू होणार आहे. त्यामुळे या संस्थेतून तज्ञ डॉक्टर्स मनपास उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे खासगीकरण कशासाठी? आणि कोणासाठी? ’’

टॅग्स :hospitalहॉस्पिटलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा