शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीतील घटक पक्ष ज्यांच्या जागा तेच लढविणार- चंद्रशेखर बावनकुळे

By विश्वास मोरे | Updated: October 11, 2023 22:41 IST

लोकसभेच्या जागांबाबत ११ पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय

विश्वास मोरे, पिंपरी : महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा आणण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. ज्यांच्या ज्या जागा आहेत, तेच लढविणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह ११ पक्ष एकत्रिपणे येऊन लोकसभेच्या जागांबाबत चर्चा केली जाणार आहे, आम्ही एकजूटीने निवडणूक लढविणार आहोत, जिंकणार आहोत, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी काळेवाडीत व्यक्त केला.

भाजपाच्या वतीने घरचलो अभियान आणि युवा वॉरीयर्स संवादासाठी बावनकुळे पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. अभियानाविषयी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, ‘‘भाजपाच्या वतीने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या कामांचा माहिती दिली जाणार आहे. अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुती म्हणून जनतेसमोर जायचे आहे. लोकसभेची कोणती जागा कोण लढवेल. याची चर्चा आताच करणे योग्य नाही. महायुतीतील घटक पक्षांच्या ज्या-ज्या जागा असतील तेच लढविणार आहेत. भाजपाची जी जागा आहे तिथे भाजपा, राष्टÑवादीची आहे, तिथे घड्याळ आणि जी शिवसेनेची आहे. तिथे धनुष्यबान चिन्हांवर निवडणूक लढवून पंतप्रधान मोदींचे हात मजबूत करण्यासाठी महायुती प्रयत्न करणार आहे. आता कोण कोणती जागा लढविणार यापेक्षा ४५ खासदार निवडूण आणायचे हाच महायुतीचा संकल्प आहे.’’

आमदार आहेत, डावलण्याचा प्रश्नच येत नाही!

आमदार अश्विनी जगताप यांनी प्रॉटोकॉल पाळला जात नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बावनकुळे यांना विचारले. बावनकुळे म्हणाले, ‘मी या प्रकाराची माहिती घेतली. आमदारांच्या विधानाचा विपर्यास केला आहे. त्या लोकप्रतिनिधी आहेत. पक्षात संघटना आणि लोकप्रतिनिधी या दोघांचेही महत्व आहे. त्यामुळे कोणीही लोकप्रतिनिधींना डावलणार नाही.’’

बारामतीत महायुतीच विजयी होणार!

बारामती लोकसभेची जागा कोणास, कोण उमेदवार असेल? याप्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ‘‘बारामतीतून महायुतीच विजयी होणार, महायुतीचाच उमेदवार असेल."

टॅग्स :ElectionनिवडणूकChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे