शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नगरसेवकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांच्या आदेशाला कोलदांडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 17:35 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वसाधारण सभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही असा आदेश काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आदेश दिला होता. मात्र, बुधवारी झालेल्या सभेत गोंधळाचा फायदा घेत  सहा विषयांच्या उपसूचना घुसडल्या.

पिंपरी : महापालिका किंवा स्थायी समितीत कोणत्याही उपसूचना घेऊ नयेत, असा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आदेश असतानाच भाजपाने प्रदेशाध्यक्षाच्या आदेशाला कोलदांडा घालत सहा उपसूचना मंजूर केल्या आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वसाधारण सभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही असा आदेश काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आदेश दिला होता. मात्र, बुधवारी झालेल्या सभेत गोंधळाचा फायदा घेत  सहा विषयांच्या उपसूचना घुसडल्या. त्यातील काही उपसूचना आर्थिक असून त्याचे वाचन देखील केले नाही. तसेच गोंधळात सभेचे कामकाज उरकत अवघ्या तीन मिनिटात सतरा विषय मंजूर केल्या आहेत.महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा  बुधवारी झाली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर उपसूचनांचा पाऊस सर्वसाधारण सभेत पडत होतात. विसंगत उपसूचना देण्याचे प्रमाण वाढले होते. तसेच पक्षातीलच सदस्यांना उपसूचना माहित होत नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्षाकडे केल्या होत्या. त्यामुळे महापालिकेतील कोणत्याही सभेत एकही उपसूचना द्यायची आणि घ्यायची नाही, असा आदेश भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिला होता. प्रदेशाध्यक्षांच्या आदेश डावलून आजच्या सभेत उपसूचना स्वीकारल्या असून त्यात आर्थिक उपसूचनांचाही समावेश आहे.तीन मिनिटात सभा उरकली.सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना बोलून न दिल्याने त्यांनी ग्लास आपटून निषेध केला. त्यावर सत्ताधाºयांनी गोधंळ घातला गोंधळातच भाजपने सभेचे कामकाज रेटून नेले. अवघ्या तीन मिनिटांत विषयपत्रिकेवरील सतरा  विषयांना मान्यता दिली. कोणताही विषय वाचला नाही, ना कोणी अनुमोदन दिले. तशीच विषयांना मान्यता दिली. तर, गोंधळाचा फायदा घेत उपसूचना देखील घुसडल्या. एकाही उपसुचनांचे देखील कोणी वाचन केले नाही. याबाबत विरोधकांनी टीका केली आहे. माजी विरोधीपक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘सत्ताधारी भाजपाचे नेते सभाशास्त्रानुसार कामकाज करीत नाहीत. तसेच नेत्यांच्या आदेशालाही कोलदांडा घालतात. उपसूचना घ्यायच्या नाहीत, असे आदेश असताना त्या स्विकारल्या. उपसूचनांचे वाचन झाले नाही. ही बाब चुकीची आहे.’’

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण