शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मावळच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 20:11 IST

शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षनेतृत्वावर केलेल्या टीकेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाच्या नगरसेवकांनी मावळवर दावा केला आहे.

पिंपरी : शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षनेतृत्वावर केलेल्या टीकेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाच्या नगरसेवकांनी मावळवर दावा केला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. युती झाल्यास ही जागा शिवसेनेला सोडल्यास आणि उमेदवार पडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.

लोकसभेची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड मधील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांत जुंपली आहे. चिंचवड येथील एका कार्यक्रमात दोन महिन्यापूर्वी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघ भाजपाला मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले असताना चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघातील ३० नगरसेवक आणि नेते गडकरी यांना भेटले. त्यात माजी उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार,  नामदेव ढाके, शितल शिंदे, शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, मोना कुलकर्णी, सुजाता पालांडे यांचा समावेश होता. पत्रातील मजकूर असा, ‘‘ शिवसेनेशी युती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. युती होऊ अथवा न होऊ याबाबत आमचे काहीही म्हणने नाही. युती झाली तरी आम्हाला काही हरकत नाही. मात्र, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या पाच वर्षांत भाजपाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री, नेत्यांविषयी टीका केली आहे. निर्णयावर टीका केली आहे. गेल्या निवडणूकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे राण करून शिवसेनेचा उमेदवार निवडूण आणला. मात्र, भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी न्याय दिला नाही. त्यामुळे भाजपाचा कोणताही उमेदवार त्याचे काम करण्यास उत्सुक नाही. शिवसेनेने दुसरा कोणताही उमेदवार दिला तरी त्याचे आम्ही काम करू. तसेच मावळ लोकसभेची जागा ही भाजपालाच मिळायला हवी. बारणे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव होईल. त्याचे खापर भाजपाच्या माथी येऊ नये, म्हणून हा मतदार संघ भाजपालाच मिळायला हवा.’’

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीmavalमावळShiv Senaशिवसेना