शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या जागांवर भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 02:04 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे.

पिंपरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे गड म्हणून परिचित असणाऱ्या शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसघांवर भाजपाने दावा केला आहे. धनुष्यबाणाचे वर्चस्व असणाºया मतदारसंघात कमळ फुलविण्याचा निर्धार चिंचवड येथील बैठकीत शुक्रवारी करण्यात आला आहे.मावळ आणि शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक चिंचवड येथे झाली. या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, विजय काळे, सुरेश हळवणकर, प्रशांत ठाकूर, बाबूराव पाचारणे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, आझम पानसरे, उमा खापरे उपस्थित होत्या.आतापर्यंत मावळ आणि शिरूरमधून भाजपाला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. आगामी निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात कमळ फुललेच पाहिजे, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आमदार सुरेश हळवणकर म्हणाले, ‘‘आगामी लोकसभेला मावळ आणि शिरूर मतदारसंघात कमळ फुललेच पाहिजे. या ईर्ष्येने कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. भाजपाचे खासदार निवडून आणून मित्रपक्ष शिवसेनेला आपली ताकत दाखवून द्यावी.’’>पिंपरी-चिंचवड शहरात जे पिकते ते राज्यभर खपते, अशी धारणा झाली आहे. येथून राज्याची राजकीय हवा लक्षात येते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पिंपरीतून फुटावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यानुसार तीन नोव्हेंबरला प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. मावळ आणि शिरूर मतदारसंघातून आजपर्यंत भाजपाला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. येणाºया निवडणुकीत भाजपाचे कार्यकर्ते मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात आपली ताकत दाखवून देतील.- लक्ष्मण जगताप,शहराध्यक्ष व आमदार, भाजपा