शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडकरांनो,सावधान; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; कडक निर्बंध लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 18:35 IST

नियम तोडणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई : आयुक्त

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. रविवारी १४०० रुग्ण आढळले आहेत. ही वाढ दोन आठवड्यांपासून आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. आयुक्तांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी बैठक घेऊन निर्बंध कडक केले आहेत. मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी आठ भरारी पथके नियुक्त केले आहेत. तसेच रुग्णसंख्येनुसार रुग्णसंख्येनुसार ऑरेंज, पिवळा आणि लाल झोन तयार केले आहेत. नियम तोडणाऱ्यांवर फौजदारी दाखल करणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. रविवारी १४०० रुग्ण आढळले आहेत. ही वाढ दोन आठवड्यांपासून आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. आयुक्तांनी नियमावली जाहीर केली आहे.

शहरात आता तीन झोन

शहरात रुग्णवाढ संख्येनुसार तीन झोन तयार केले आहेत. गृहनिर्माण सोसायटी, वस्ती, कॉलनी तीन विभागांत वर्गीकरण करण्यात येणार आहे. एलो, ऑरेंज आणि रेड झोनची निर्मिती केली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय हद्दीत एक याप्रमाणे आठ अंमलबजावणी पथके नियुक्त केली आहेत.

असे आहेत झोन...१) पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येनुसार वर्गीकरण केले असून, एकूण लोकसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी रुग्णसंख्या आढळलेल्या भागास पिवळा भाग म्हटले आहे.

२) एकूण लोकसंख्येच्या पाच ते वीस टक्के रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास ऑरेंज झोन म्हटले आहे.

३) शहराच्या एकूण लोकसंख्येच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळलेल्या परिसरास लाल (रेड झोन) म्हटले आहे.

दुकाने सील करणारशहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनामास्क वावरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, सॅनिटायझरचा सुविधा न करणे याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आठ भरारी पथके नेमली आहेत. भाजी मंडई, बाजारपेठ, मजूर अड्डे यांसह इतर गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या नियमांचे उल्लंघन यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच दुकाने सील करण्यासाठी स्वतंत्र आठ पथके नेमण्यात आली आहेत. यात दोन पोलिसांचा समावेश असणार आहे.शहर पातळीवर गस्त वाढविणार

महापालिकेच्या वतीने आठ क्षेत्रीय कार्यालयांत वॉर रूम, हेल्पलाइन कार्यान्वित केली जाणार आहे. आकाशचिन्ह परवाना विभागामार्फत जनजागृती फलक लावण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्ती वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. रिक्षा, टेम्पोद्वारे जनजागृती केली जाणार आहे.

-राजेश पाटील, आयुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcommissionerआयुक्त