शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाला फेकले नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 06:35 IST

पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी टपरीचालक तरुणाला मारहाण करत पुलावरून नदीपात्रात फेकले. सुदैवाने नागरिकांच्या व अग्निशामक दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे तरुणाचे प्राण वाचले.

पिंपरी : पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी टपरीचालक तरुणाला मारहाण करत पुलावरून नदीपात्रात फेकले. सुदैवाने नागरिकांच्या व अग्निशामक दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे तरुणाचे प्राण वाचले. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास सांगवी येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर संजय चंदनशिवे (वय १८, रा. हनुमान मंदिराजवळ, औंध) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. चंदनशिवे याची सांगवी बसस्थानकाजवळ टपरी आहे. तो टपरीत बसला असताना तिघे जण त्याच्याकडे आले. त्यांनी चंदनशिवे याच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, चंदनशिवे याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तिघा आरोपींनी त्याला पुलावर नेऊन मारहाण केली आणि उचलून नदीपात्रात फेकले.महापालिका अग्निशामक दलाचे जवान सध्या गणेश विसर्जनानिमित्त नदीघाटावर तैनात आहेत. घाटावर पाहणी करण्यासाठी आलेल्या उप अधिकारी सूर्यकांत मठपती यांना नागरिकांनी तरुण नदीत पडल्याचे सांगितले. मठपती यांच्यासह त्यांच्या सहकाºयांनी नदीत पाहणी करून चंदनशिवे याला बाहेर काढले.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस