शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘सनबर्न’ला बावधन ग्रामस्थांचा विरोध; एकही गाडी जाऊ न देण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 12:47 IST

आॅक्सफर्ड गोल्फ क्लब, मुळशी येथे होऊ घातलेल्या कथित ‘सनबर्न’ कार्यक्रमाला बावधन ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.

ठळक मुद्देकार्यक्रमासाठी कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने दिले नसताना होत आहे कार्यक्रमलवळे ते बावधन ग्रामपंचायतीदरम्यान बावधन हद्दीत २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबरला आयोजन

वाकड : आॅक्सफर्ड गोल्फ क्लब, मुळशी येथे होऊ घातलेल्या कथित ‘सनबर्न’ कार्यक्रमाला बावधन ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या ‘सनबर्न’साठी एकही गाडी जाऊ न देण्याचा निर्धार करीत नगरसेवक किरण दगडे, सरपंच पीयुषा दगडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी, हिंजवडी पोलीस व मुळशी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. मुळशी तालुक्यातील लवळे ते बावधन ग्रामपंचायतीदरम्यान डोंगरावरील बावधन हद्दीत २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर रोजी तीन दिवस गाणी व नृत्याच्या ‘सनबर्न’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एका संकेतस्थळावर या कार्यक्रमाची तिकिटे विकली जात आहेत. मात्र हा सनबर्न फेस्टिव्हल पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात ते ही बावधन गावच्या हद्दीत होत असल्याने बावधनच्या सरपंच पीयुषा दगडे व इतर सदस्यांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला आहे. या कार्यक्रमासाठी कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने दिले नसताना हा कार्यक्रम होत आहे. त्यामुळे या कार्यक्रमास परवानगी देऊ नये,  या आशयाचे पत्र हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांना दिले आहे. नगरसेवक किरण दगडे, बावधनच्या सरपंच पीयुषा दगडे, बावधन ग्रामपंचायत सदस्य सचिन बबनराव दगडे, आझाद दगडे, प्रदीप दगडे, सचिन शंकरराव दगडे, वैशाली दगडे, कल्पना घुले, शीतल दगडे यांनी गुरुवारी हिंजवडी पोलिसांना तसेच मुळशी तहसीलदार सचिन डोंगरे यांना पत्र देत या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकडPuneपुणे