शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

बिनविरोध श्रेयाची लढाई

By admin | Updated: February 8, 2017 23:19 IST

बिनविरोध श्रेयाची लढाई

 

महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी भोसरीतील धावडेवस्ती प्रभागात भाजपाचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतने रवी लांडगे हे रिंगणात असल्याने शिवसेना आणि राष्टÑवादी, मनसेने उमेदवारी दिली नाही. तर अपक्ष म्हणून सुलोचना बढे आणि योगेश लांडगे यांनी अर्ज भरले होते. सुलोचना बढे यांनी सोमवारी माघार घेतली. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी योगेश यांची समजूत काढल्याने माघार घेतली, अशी चर्चा आहे. तर रवी लांडगे यांची निवड होताच माजी आमदार विलास लांडे हे रवी लांडगे यांना शुभेच्छा देत आहेत, केक कापतानाचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले.  भाजपाचे माजी शहराध्यक्ष अकुंश लांडगे यांचे माजी आमदार विलास लांडे, शिवसेना गटप्रमुख सुलभा उबाळे अशा सर्वपक्षीयांशी जिव्हाळ्यांचे संबंध होते. त्यामुळे लांडगे यांचे पुतणे म्हणून त्यांना संधी मिळण्यासाठी अन्य पक्षांनी उमेदवार दिले नसल्याची चर्चा आहे. श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.

राष्टÑवादीच्या श्रेयाविषयी आमदार लक्ष्मण जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘उद्या महापालिकेत सत्ता आली तर ती राष्टÑवादीमुळेच आली, असे म्हटले तर आश्चर्य वाटू नये. भोसरीत एक भाजपाचा उमेदवार बिनविरोध होणे यातून महापालिकेत भाजपाची सत्ता येण्याचे द्योतक आहे.’’

 

महापालिकेच्या गेल्या तीन निवडणूकींपासून एकतरी नगरसेवक बिनविरोध येण्याची पंरपरा कायम आहे. महापालिकेच्या   चिंचवड मधून आझम पानसरे,  त्यानंतर २००७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार जावेद शेख बिनविरोध निवडून आले होते. 

तर २०१२ मध्ये चिंचवड विधानसभेतील पिंपळेगुरव परिसरातून राष्ट्रवादीच्या शकुंतला धराडे आणि रामदास बोकड हे बिनविरोध निवडून आले होते. आता २०१७च्या निवडणुकीत भोसरीतून रवी लांडगे बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे पिंपरी महापालिका निवडणुकीतील बिनविरोधची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. रवी लांडगे यांचे दिवंगत वडील लक्ष्मण लांडगे भाजपचे नगरसेवक आणि महापालिकेची विरोधी पक्षनेते होते. तसेच भाजपा शहराध्यक्ष अकुंश लांडगे यांचे ते पुतणे होत.