शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव मावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांची झाली दुरावस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:52 IST

शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे.

ठळक मुद्दे वडगाव शहराची लोकसंख्या सुमारे ३० हजारइंद्रायणी नदीवरून जांभूळ येथील बंधारा, कातवी व सांगवी येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा

विजय सुराणा वडगाव मावळ : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. पाणी असूनही नियोजनाअभावी पाणीटंचाई झाली आहे. वडगाव शहराची लोकसंख्या सुमारे ३० हजार आहे. सुदैवाने शहरात पाण्याची उपलब्धता योग्य आहे. परंतु नियोजन नसल्याने काही भागात कमी प्रमाणात पाणी येते. काही ठिकाणी नळाला थेंब थेंब येते, तर काही भागात धो धो पाणी येते. आतापर्यंत शहरात दुष्काळाची झळ न बसल्याने व पाण्याची किंमत न समजल्याने शहरातील काही भागात नळावाटे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वडगावमधील काही भागात कमी दाबाने पाणी येत असल्याने महिलांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.वडगाव शहरात पूर्वीपासून ग्रामपंचायत होती. ती बरखास्त होऊन नगरपंचायतमध्ये समावेश झाला आहे. नळपाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांना अर्धा इंच पाईपलाईन टाकून नळजोड द्यायचा नियम आहे. परंतु , ग्रामपंचायत असताना अनेकांनी हा नियम धाब्यावर बसवून एक इंची पाईपलाईन टाकून नळावाटे पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. त्यामुळे त्यांना धो धो पाणी मिळते, तर काहींना थेंब थेब पाणी मिळत आहे.इंद्रायणी नदीवरून जांभूळ येथील बंधारा, कातवी व सांगवी येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून पूर्वी जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर बंधारा बांधला. त्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. नदीतून येणारे हे पाणी शहरातील शिंदे टेकडी, डेक्कन हिल, न्यू इंग्लिश स्कूल, संस्कृतीनगर, म्हाळसकर वस्ती, हरणेश्वर टेकडी, मिलिंदनगर, कातवी व टाटा हौसिंग येथील आठ पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला पाणीपुरवठा केला जातो. ..........पाण्यासाठी भटकंती

* शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून पूर्वी जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर बंधारा बांधला. त्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. नदीतून येणारे हे पाणी शहरातील शिंदे टेकडी, डेक्कन हिल, न्यू इंग्लिश स्कूल, संस्कृतीनगर, म्हाळसकर वस्ती, हरणेश्वर टेकडी, मिलिंदनगर, कातवी व टाटा हौसिंग येथील आठ पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला पाणीपुरवठा केला जातो. ४१० लाख लिटर एवढी साठवण क्षमता या टाक्यांची आहे. तसेच केशवनगर भागासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. वडगाव शहराची लोकसंख्या ३० हजार आहे. त्याप्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु, काही ठिकाणी कमी प्रमाणात पाणी येते. तर काही ठिकाणी जादा प्रमाणात पाणी येते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे......* लोकसंख्येच्या मानाने शहराला मुबलक पाणी असतानाही शहरातील काही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, यासाठी नगरसेवकांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. * वडगाव शहराला पाणीपुरवठा होत असलेला जांभूळ येथील बंधारा पूर्णपणे निकामी झाला असून, तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अन्यथा हा कोसळल्यास शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो.

‘‘केशवनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम महिनाभरात पूर्ण होईल. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येणार असून, जांभूळ येथील बंधाºयाचे काम लवकरच करण्यात येईल.’’  मयूर ढोरे, नगराध्यक्ष

 

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळWaterपाणी