शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

अधिकारीपदासाठी महापालिकेत लिलाव, अर्थकारणाला कंटाळून डॉक्टरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 5:08 AM

महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर गंभीर आक्षेप घेतला आहे. वैद्यकीय अधिकारीपदासाठी लाखोंची बोली लावल्याची, तसेच बढती-बदलीच्या अर्थकारणाला आणि राजकारणाला कंटाळून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

पिंपरी : महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर गंभीर आक्षेप घेतला आहे.वैद्यकीय अधिकारीपदासाठी लाखोंची बोली लावल्याची, तसेच बढती-बदलीच्या अर्थकारणाला आणि राजकारणाला कंटाळून स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे विधी समितीच्या बैठकीत विद्यामान आरोग्य अधिकारी डॉ. अनिल राय यांच्याऐवजी डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात डॉ. अनिल रॉय यांनी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. साळवे यांच्यावर तत्कालीन सत्ताधाºयांनी अन्याय केल्याच्या आणि त्यांना न्याय देण्याच्या भावनेने साळवे यांना पद देण्याचा निर्णय विधी समितीने घेतला आहे. चार वर्षांनंतर संबंधित पद काढून घेतल्याने महापालिकेतील बदल्याच्या अर्थकारण आणि राजकारणाविरोधात डॉ. रॉय यांनी आवाज उठविला आहे.सोशल मीडियावर व्हायरल...सत्ताधीशांचा आणि प्रशासनाचाही आपल्यावर विश्वास नाही. त्यामुळे विदारक परिस्थितीत आपण आरोग्य अधिकारी पदावर राहणे संयुक्तिक वाटत नसल्याचे डॉ. रॉय यांनी स्वेच्छानिवृत्ती अर्जात म्हटले आहे. विशेष म्हणजे हा अर्ज सोशल मीडियामध्ये फिरत आहे.साडेचार वर्षांनंतर साक्षात्कार१ जून २०१३ पासून मी आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असून, चार आयुक्तांसमवेत काम केले. या चारही आयुक्तांनी आपणास दिलेली बढती नियमानुसार असल्याचे राज्य शासन, राष्ट्रीय व राज्य अनुसूचित जाती आयोग, खासगी संस्था, नगरसेवकांना लेखी कळविले. त्याबाबतचा पत्रव्यवहार आजही उपलब्ध आहे. आता साडेचार वर्षांनंतर प्रशासनाला मला दिलेली बढती योग्य नसल्याचा साक्षात्कार कसा झाला? या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची धारणा आहे. पदावर असताना माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसून, सर्व आयुक्तांनी मला गोपनीय अहवालात अत्युत्कृष्ट शेरांकन दिले आहे, असे असताना साडेचार वर्षांनंतर पद काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भावना रॉय यांनी प्रशासनास दिलेल्या अर्जात व्यक्त केली.पदासाठी प्रशासनावर दबावडॉ. रॉय यांना पदभार दिल्यानंतर डॉ. साळवे यांनीही आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून त्यासाठी लढा दिला होता. प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला होता. महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांत सत्ताधाºयांनी रॉय यांचा पदभार काढण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. साळवे हे खासदार अमर साबळे यांचे निकटवर्तीय असून त्यांच्या नावासाठी भाजपातील एक गट आग्रही होता. तर भाजपातील साबळे विरोधी गटाचा डॉ. रॉय यांच्या नावास पाठिंबा आहे. भाजपातील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी साळवे यांच्या नावाला पसंती दिली.विधी संशयाच्या भोवºयातदोनदा विधी समिती तहकुबीनंतर डॉ. साळवे यांचा विषय मंजूर केला. या पदासाठी अर्थकारण झाल्याचा आरोप रॉय यांनी केल्याने विधी समिती संशयाच्या भोवºयात आली आहे. या पदासाठी लाखोंची बोली लावली असल्याची चर्चा आज महापालिकेत होती. तर विधी समितीलाच एवढी रक्कम कशी? यामुळे भाजपाचे महापालिकेतील पदाधिकारी अस्वस्थ झाले आहे. दरम्यान येत्या महासभेत डॉ. साळवे यांना देण्यात येणाºया पदाला अंतिम मंजुरी देण्याचा विषय येणार आहे.