शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाला लुटणे पडले महागात, सहा दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:11 IST

वकिलाला मारहाण करून लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना भोसरी पोलिसांनी अखेर गजाआड केले. त्यांच्याकडून दरोड्यातील पाच लाख ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

भोसरी - वकिलाला मारहाण करून लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना भोसरी पोलिसांनी अखेर गजाआड केले. त्यांच्याकडून दरोड्यातील पाच लाख ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.अतुल मुरलीधर नाईक (वय २३, रा. राधानगरी हाऊसिंग सोसायटी, दिघी रोड, भोसरी), आकाश महादेव काळपांडे (वय २४, रा. सावंतनगर, दिघी), गोकूळ कृष्णा निखाडे (वय २२, रा. आळंदी रोड, भोसरी), शुभम बाबूराव तायडे (वय १९, रा. आळंदी रोड, भोसरी), राजकुमार उमाजी डामसे (वय २०, रा. बनकर वस्ती, मोशी), जगदीश दिगंबर इंगळवाड (वय १८, रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडल तीनचे पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी महादेव धनगर, बाळासाहेब विधाते, समीर रासकर यांनी ही कारवाई केली.मागील गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी जागा दिली नाही, या कारणावरून एका वकिलाला अडवून त्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार घडला होता. याबाबत वकिलाने भोसरी पोलिसात अज्ञात सहा जणांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार तपास सुरू असताना पोलिसांना गुप्तहेरांमार्फत संशयास्पद व्यक्तींबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आठ मोबाईल फोन, सोन्याची चेन, सात हजार ५०० रुपये आणि एक स्विफ्ट कार (एमएच १२, एचएल ८८३२) असा एकूण पाच लाख ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यातील खंडणीसाठी अपहरण केल्याचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड