शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ॲट्रॉसिटी कायदा: पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ महिन्यांत २० गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 13:34 IST

-नारायण बडगुजर पिंपरी : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कायद्यांतर्गत गुन्हे वाढत आहेत. यंदा जानेवारी ते सप्टेंबर ...

-नारायण बडगुजर

पिंपरी : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कायद्यांतर्गत गुन्हे वाढत आहेत. यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत २० गुन्हे दाखल झाले. त्यातील सहा गुन्हे सप्टेंबरमध्ये दाखल झाले. यात बलात्कार, विनयभंग यासह जमीनीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याचे प्रकार जास्त आहेत.खून, दरोडा, लुटमार, अशा गंभीर गुन्ह्यांसह महिला अत्याचारांच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. त्यात जातीवाचक बोलून हिणवण्याचे प्रकार घडतात. असे कृत्य करून अत्याचार केल्याचेही काही घटनांवरून समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. असे असतानाही गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येते.

अल्पवयीनांचा समावेश-

ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील पीडितांमध्ये काही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल २० प्रकरणांमध्ये ५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

नऊ महिन्यांत ४२ जणांना अटक-

ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये नऊ महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ४२ जणांना अटक केली. तसेच दाखल २० गुन्ह्यांपैकी नऊ प्रकरणे न्यायालयात असून, १० गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या २० गुन्ह्यांमध्ये २३ पीडित असून त्यात १७ महिलांचा समावेश आहे.

बलात्काराची सात प्रकरणे-

ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल २० गुन्ह्यांमध्ये सात गुन्हे बलात्कार प्रकरणी आहेत. यात दोन गुन्हे बाल लैंगिक अत्याचाराचे असून त्यात एका मतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचाराचा एक गुन्हा आहे. पीडित महिला ही अनुसूचित जाती जमातीची असल्याचे माहीत असतानाही लग्नाचे आमिष दाखवून तसेच प्रेमसंबंधातून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच पाच गुन्हे विनयभंग प्रकरणी आहेत. जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी सात तर खून प्रकरणी एक गुन्हा ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल आहे.    

चाकण पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल-

ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत नऊ महिन्यांमध्ये दाखल २० पैकी सर्वाधिक सात गुन्हे चाकण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. दिघी पोलीस ठाण्यात तीन, वाकड व भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, निगडी, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, महाळुंगे, सांगवी या पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला.  

ॲट्रॉसिटी कायदा १९८९ व नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल गुन्हे-

वर्ष - गुन्हे२०१९ - ४७२०२० - २१२०२१ (सप्टेंबरपर्यंत) - २०

टॅग्स :PuneपुणेAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाpimpri-acपिंपरी