शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत 

By विश्वास मोरे | Updated: June 19, 2025 18:30 IST

- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल...याची अनुभूती घेण्यासाठी निघालेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश केला आहे. वरुणराजाचा अभिषेक,  हरिनाम गजराने उद्योगनगरी दुमदुमली आहे. 

पिंपरी :  बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल...,  याची अनुभूती घेण्यासाठी निघालेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश केला आहे. वरुणराजाचा अभिषेक,  हरिनाम गजराने उद्योगनगरी दुमदुमली आहे. 

देहूकारांचे आदरातिथ्य स्वीकारून सकाळी तुकोबारायांचा पालखी सोहळा वारीची वाट चालू लागला. इनामदार वाड्यामध्ये देहू देवस्थानाच्या वतीने महापूजा करण्यात आली. 

 पहिली अभंगाआरती अनगड शहावली बाबा दर्गा येथे झाली. भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद आणि कल्पना काशीद यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे तरीही वारकऱ्यांचा उत्साह कमी झालेला नाही. दुपारी चिंचोली येथे दुपारचा विसावा झाला. त्यानंतर देहूरोड मार्गे पालखी सोहळा सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरी चिंचवडच्या सीमेवर पोहोचला. त्यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. रेनकोट छत्री घेऊन वारकरीची वाट चालत होतो. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भक्ती शक्ती चौकामध्ये सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पालख्यांचे स्वागत करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिंडी प्रमुखांचे स्वागत केले. यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजय खोराटे आधी उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. वारकऱ्यांचा उत्साह अपूर्व 

शहरामध्ये ठीक ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केली.  भक्ती शक्ती चौकामध्ये अभूतपूर्व गर्दी झाली होती.  पाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. याचवेळी महापालिकेच्या कक्षा समोर मोहक फुलांनी सजवलेला रथ आला. उड्डाणपूलाखाली भर पावसातही वारकरी भाविक सोहळा अनुभवत होते. त्यानंतर  निगडीमध्ये काही काळ पालखीला विसावा घेतला.  त्यानंतर सायंकाळी पालखी सोहळा आकुर्डी येथे विसावला.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण