शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 03:48 IST

शहरातील नागरिकांना विशेषत: महिलांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे

रावेत : शहरातील नागरिकांना विशेषत: महिलांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात सर्वच भागांत भटक्या कुत्र्यांचा व डुकरांचा उपद्रव वाढला असून, त्यांची संख्या वाढत आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न वाढत असल्याने या भटक्या प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कुत्र्यांची संख्या वाढत असून, भटक्या कुत्र्यांनी महिला, शालेय विद्यार्थ्यांना चावा घेतल्याच्या घटना शहरात नेहमीच घडत आहेत. महापालिकेकडून श्वानपथक उदासीन झाल्याने मोकाट प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. यासाठी लवकरात-लवकर भटक्या प्राण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविण्यात येणे गरजेचे आहे. शहरातील विविध भागांत तक्रारी येऊन देखील पालिकेकडून ठोस उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडत असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पाहता त्यांचे निर्बीजीकरण करणे गरजेचे आहे.महापालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात येते. मात्र, तरीही त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही परिसरातून भटकी कुत्री आणून सोडली जात आहेत. त्याचा शोध घेऊन त्या बाबत उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :dogकुत्राpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड