शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्ट्रक्चरल आॅडिटसाठी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:48 IST

कार्यकारी संचालक : मेट्रो कामात अपघात रोखण्यासाठी दक्षता

पिंपरी : पुणे मेट्रोने केलेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती महामेट्रोने केली आहे. त्यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पुणे मेट्रोचे प्रकल्प कार्यकारी संचालक गौतम बिºहाडे यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत पिंपरी ते दापोडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असून यामध्ये नाशिक फाटा येथे ५ जानेवारीला पायलिंग रिंग मशिन कोसळून अपघात झाला होता. या अपघाताची चौकशी व ‘मेट्रोचे सेफ्टी स्ट्रक्चरल आॅडिट’ करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी महामेट्रोकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार वाकडकर यांच्या पत्राला उत्तर देताना बिºहाडे यांनी ही माहिती दिली. पत्रात म्हटले आहे की, मेट्रोच्या कामाची गुणवत्ता व सुरक्षा यांची तपासणी फ्रान्समधील ब्युरो वेरिटास या कंपनीकडून केली जाते. तसेच पुणे मेट्रोने केलेल्या कामाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती महामेट्रोने केली आहे. त्यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पाचे काम सुरक्षितपणे प्रगती पथावर असून पुढील काळात कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असेही बिºहाडे यांनी नमूद केले आहे.दोन अभियंते, रिंग आॅपरेटरना केले निलंबितया अपघाताची चौकशी महामेट्रोने पूर्ण केली असून दोन अभियंते व रिंग आॅपरेटर यांना निलंबित केले आहे. पाईल काम करणाऱ्या कंपनीस पाच लाख रुपयांचा दंड महामेट्रोने केला असून, या अपघाताबाबत भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. यासह मेट्रो कामावर वापरण्यात येणाºया पाईल रिंग व क्रेनची तपासणी शासनमान्य संस्थेमार्फत करण्यात येते. मशिन आॅपरेटला ठरावीक कालावधीने प्रशिक्षण देणे, सर्व मशिन चालकांची वैद्यकीय तपासणी दर सहा महिन्यांनी वैद्यकीय अधिकाºयांमार्फत करणे, तसेच सुरक्षिततेबाबत वरिष्ठ सुरक्षा अधिकाºयांमार्फत माहिती व प्रशिक्षण देण्यात येते, अशीही माहिती मेट्रो रेल कॉर्पोरेशनने विशाल वाकडकर यांना लेखी पत्राद्वारे दिली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे