शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल ‘रेरा’साठी ‘सीए’ची नेमणूक, महापालिकेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 02:40 IST

महापालिकेमार्फ त पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरकुल योजनेसाठी ‘महारेरा’ कायदा लागू होतो.

पिंपरी - महापालिकेमार्फ त पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरकुल योजनेसाठी ‘महारेरा’ कायदा लागू होतो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेमार्फत सनदी लेखापालाची कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी सीएला प्रत्येक प्रकल्पाकरिता ४ लाख ४० हजार रुपये शुल्क देण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य संपदा कायद्यांतर्गत ५०० चौरस मीटर पेक्षा अधिक भूखंड किंवा आठपेक्षा जास्त सदनिका असणाऱ्या प्रकल्पांना रेरा कायद्यांतर्गत नोंदणी करणे गरजेचे आहे. याअंतर्गत प्रवर्तकांनी प्रकल्पाची नोंदणी करणे आणि कायद्यातील नियम व अटीनुसार प्रकल्पाचे पालन करणे गरजेचे आहे.या कायद्यांतर्गत प्रकल्पाची महा रेरा नोंदणी करणे, प्रकल्पनिहाय लेखापुस्तके तयार करून ताळेबंद तयार करणे, प्रकल्पाच्या सद्य:स्थितीची माहिती प्रति तीन महिन्यांत रेराला सादर करणे, प्रकल्पाचे लेखापरीक्षण करणे, अंमलबजावणीसाठी रेराविषयक सल्ला घेणे या कामांचा समावेश आहे. अशा प्रकारचे समांतर काम यापूर्वी महापालिकेत करण्यात आलेले नाही. चºहोली प्रकल्पाकरिता अडीच वर्षे कालावधी निश्चित धरून दर मागविण्यात आले. त्यात प्रास अ‍ॅण्ड असोसिएटस एलएलपी या सनदी लेखापालांचा लघुत्तम दर प्राप्त झाला. त्यांना दर कमी करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार, त्यांनी ४ लाख ४० हजार रुपये असा कमी दर सादर केला. प्रास अ‍ॅण्ड असोसिएटस यांनी हे काम महापालिका मुख्यालयात येऊन करण्याचे मान्य केले आहे. कामाचे विशेष स्वरूप पाहता आणि कालमर्यादा लक्षात घेऊन या कामासाठी निविदा कार्यवाही करण्यात येणार नाही.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबवत आहे. या प्रकल्पातील सदनिकांची संख्या आठ पेक्षा जास्त आहे. तसेच भूभागही ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या प्रकल्पास रेरा कायदा लागू होत आहे. या कायद्याची अंमलबजावणी महापालिकेत पहिल्यांदाच होत असल्याने आणि हे काम विशिष्ट प्रकारचे असल्याने कायद्याची योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी न केल्यास प्रकल्प खर्चाच्या १० टक्क्यांपर्यंत दंडाची तरतूद कायद्यात आहे. त्यासाठी या कामाकरिता माहितीगार सनदी लेखापालाची नेमणूक करणे आवश्यक आहे. हे काम करण्यासाठी सनदी लेखापाल यांना किती शुल्क द्यायचे याबाबत दर उपलब्ध नाहीत. 

 

 

टॅग्स :Rera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड