शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाराजांचे राजीनामास्त्र म्यान, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 03:29 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षनिवडीवरून चार दिवसांपासून भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांनी सुरू केलेले बंड आज शमले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांशी मुंबईत सोमवारी चर्चा केली.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षनिवडीवरून चार दिवसांपासून भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थकांनी सुरू केलेले बंड आज शमले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांशी मुंबईत सोमवारी चर्चा केली. त्यामुळे राजीनामास्त्र म्यान केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे. त्यामुळे महापौर नितीन काळजे यांना अभय मिळणार आहे.महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदावरून सत्ताधारी भाजपात वादळ सुरू झाले आहे. पाच हजार कोटींचा अर्थसंकल्प असणाºया महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या समर्थकांच्या हाती घेण्यासाठी भाजपातील स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा लागली होती. अध्यक्षपदासाठी निष्ठावान विलास मडिगेरी, शीतल शिंदे, राहुल जाधव यांच्या नावाची चर्चा होती. प्रत्येकाने १०० टक्के निवडीचा दावाही केला होता. त्यामुळे तिघांपैकीच एकाला संधी मिळेल, असे चित्र होते. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ अगोदर माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांची पत्नी ममता गायकवाड यांचे नाव पुढे आले.गायकवाड यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड निश्चित असून, सात मार्चला त्यांच्या नावावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होईल. त्या भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक आहेत. अध्यक्षपदासाठी राहुल जाधव यांना डावलल्याने आमदार लांडगे यांच्या गटाने बंड पुकारले होते. महापौर नितीन काळजे, स्थायी सदस्य राहुल जाधव, क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामा दिला. जुने निष्ठावान शीतल शिंदे यांनीदेखील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पक्षांतर्गत बदलांची दखल भाजपाच्या नेतृत्वानेघेतली. गेल्या दोन दिवसांपासून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.महापालिकेतील बैठकीस उपस्थितीराजीनामा दिल्यानंतर महापौर महापालिका भवनात येणार की नाहीत, याबाबत उत्सुकता होती. राजीनामास्त्र म्यान होणार, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. आजच्या महापालिकेतील बैठकीस महापौर उपस्थित होते. त्यावरून राजीनामास्त्र म्यान केल्याचे दिसून आले. याबाबत महापौरांनी कोणतीही भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. हा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेल्याचे सांगितले. महापौर नितीन काळजे म्हणाले, की आम्ही आमचे राजीनामे शहराध्यक्षांकडे दिले होते. याबाबत शहरातील दोन्ही आमदार निर्णय घेतील.

टॅग्स :BJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड