पिंपरी : स्वच्छ भारत अभियानात अव्वल क्रमांक येण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी यांच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुधवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर व हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या व्यवस्थापकीय संचालिका निरजा सराफ यांनी सहभाग घेतला.स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणाची टीम पुढील महिन्यांत येणार आहे. त्यामुळे प्रबोधन अभियान आणि जागृती सुरू केली आहे. आज सकाळी एचए मैदानावरील व लगतचा कचरा उचलण्यात आला. त्यात अधिकारी सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेमध्ये क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, आशा राऊत, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीचे उपमहाप्रबंधक सी. व्ही. पूरम, आॅफिसर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी के. एन. नरोटे, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स मजदूर संघाचे उपाध्यक्ष विजय पाटील, प्रवीण मोरे, खजिनदार शंकर बारणे, प्रवीण रूपनर, वरिष्ठ कार्मिक अधिकारी सुनीता शिवतारे यांच्यासह सुमारे १०० कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.
...अन् एचए मैदान झाले चकाचक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:10 IST