शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

अप्पूघरमधील खेळण्याची दुरुस्ती करा : राहुल जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 00:51 IST

निगडी येथील अप्पूघरला महापौर राहुल जाधव यांनी भेट दिली. खेळणी नादुरुस्त असल्याचे पाहून महापौरांनी नाराजी व्यक्त केली.

पिंपरी  - निगडी येथील अप्पूघरला महापौर राहुल जाधव यांनी भेट दिली. खेळणी नादुरुस्त असल्याचे पाहून महापौरांनी नाराजी व्यक्त केली. पर्यटन विकासाला चालणा देणारा उपक्रम बंद होऊ नये, याची दक्षता घेण्याची गरज आहे़ नादुरुस्त खेळणी दुरुस्ती करावी, अशा सूचना महापौरांनी प्रशासनास दिल्या आहेत.अप्पूघर, निगडी या ठिकाणी महापालिकेच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महापौर यांनी अप्पूघर उद्यानाची पाहणी केली. त्या वेळी महापौरांनी नाराजी व्यक्त केली. त्या वेळी नगरसदस्य शर्मिला बाबर, सहायक आयुक्त आशा राऊत, अप्पूघरचे संचालक डॉ. राजेश मेहता आदी उपस्थित होते. अप्पूघर हे खासगी संस्थेला चालवण्यास दिले असल्याने महापालिकेचे त्यावर नियंत्रण राहिलेले नाही. येथील अनेक खेळणी बंद पडल्याने पर्यटक कमी झाले आहेत.अप्पूघर येथे असलेली खेळणी खराब झालेली आहेत. त्यांची दुरुस्ती करणे, रंगरंगोटी करणे, नवीन खेळणी बसविणे, अप्पूघरमध्ये मुले व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खेळणी सुस्थितीत ठेवणे, सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे, बंद असलेली खेळणी दुरुस्त करून चालू करणे, अप्पूघर उद्यानात वृक्षारोपण करणे आदी सूचना महापौर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.महापौर राहूल जाधव म्हणाले, ‘‘अप्पूघर हे काही वर्षांपूर्वी शहराची ओळख होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अप्पूघर विषयी तक्रारी येत आहेत. खेळणी बंद असल्याने पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. महापालिकेने बसविलेली व ठेकेदारामार्फत बसविलेली खेळणींची माहिती मागविली असून, अप्पूघर संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल. हा प्रकल्प सुरू राहून पर्यटनविकासाला चालना मिळण्याची गरज आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड