शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आकुर्डीत वारकरी भवन, पालखी तळ आरक्षण हवे; वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

By विश्वास मोरे | Updated: February 2, 2024 18:20 IST

पालखी तळासाठी मैदान आरक्षित करावे, कीर्तन महोत्सवाचे आयोजन करावे, अशा मागण्या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत....

पिंपरी :संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनाला यंदा ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आकुर्डी येथील मुक्कामाला ३०० हून अधिक वर्षे पूर्ण होत आहेत. महापालिकेने आकुर्डीत वारकरी भवन उभारावे. पालखी तळासाठी मैदान आरक्षित करावे, कीर्तन महोत्सवाचे आयोजन करावे, अशा मागण्या महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.

महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळासमेवत आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. आयुक्तांनी त्यांच्या दालनात बैठक घेऊन या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी उपमहापौर शैलजा मोरे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे इनामदार, संत तुकाराम संस्थान कमिटी अध्यक्ष पुरूषोत्तम मोरे इनामदार, विश्वस्त विशाल महाराज मोरे इनामदार, भंडारा डोंगर समिती अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील,  आप्पा बागल, खंडोबा ट्रस्ट निगडीचे अध्यक्ष तानाजी काळभोर. शिवानंद स्वामी, हभप जयवंत देवकर आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनाला यंदा ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच वारीत पंढरीच्या ओढीने जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पिंपरी-चिंचडमधील पहिल्या मुक्कामालाही ३०० वर्षाहून अधिक वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने वारकऱ्यांनी मागण्या केल्या. वारकरी यांच्या मागण्यांवर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.वारकऱ्यांनी केल्या मागण्या१) आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी भवन उभारावे. वारकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी.२) शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्याचा वेध घेऊन वारीची परंपरा अखंड सुरू राहावी, यासाठी पालखी तळासाठी मोठे मैदान आरक्षित करावे.३) मेट्रोच्या खांबावर संतांचे तैलचित्र, त्यांचे अभंग व वारकरी संप्रदायांशी संबंधित म्युरल्स उभारण्याबाबत कार्यवाही करावी.४) महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी किर्तन महोत्सवाचे आयोजन करावे.

टॅग्स :Puneपुणेsant tukaramसंत तुकाराम