शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

राज्यात एकच मंत्री, उपमुख्यमंत्री बिनखात्याचेच; अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका

By नारायण बडगुजर | Updated: August 6, 2022 19:53 IST

युती, आघाडीचा निर्णय राजकीय परिस्थितीनुसार....

पिंपरी : गेल्या एक महिन्यापासून राज्यामध्ये अवघ्या एका व्यक्तीचं मंत्रीमंडळ आहे. मुख्यमंत्री एकटे आणि त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आहेत. असे असले तरी त्यांना खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे फडणवीस बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत, असा टोला लगावत विधानसभेचे विरोधी पथनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे ‘निर्धार महाविजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा’ ही संवाद सभा चिंचवड येथे झाली. त्यावेळी अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, निवडणुका घेण्याबाबत न्यायालयाने सांगितले आहे. तरीही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. महापालिकेची प्रभागरचना, जिल्हा परिषदेची गट रचना बदलून सदस्य संख्या कमी केली. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होता पण, बाकीच्यांना मात्र प्रतिनिधित्व द्यायचे नाही, असे सुरू आहे. यातून लोकशाहीचा खून केला, मुडदा पाडला. लोकांच्यातून नगराध्यक्ष निवडून आणला जाणार आहे. मग तसा महापौर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान देखील थेट लोकांमधून निवडून आणा. इतरांसाठी एक न्याय आणि तुमच्यासाठी दुसरा न्याय, हे कसे चालेल? लोक आता गप्प आहेत. मात्र, संधी मिळाल्यावर कुठलं बटण दाबतील हे कळणार नाही. मनामध्ये आल्यास जनता कुणालाही उलथवून टाकू शकते. 

मुख्यमंत्र्यांचे अधिकार चिफ सेक्रेटरीला द्यामंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. मग राज्याचे अधिकारही चिफ सेक्रेटरीला द्यावेत आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घरी बसावे. मंत्रीमंडळ लवकरच होणार, असे सांगितले जाते. मात्र, ते कधी येणार हे सांगत नाहीत. त्यात काय अडचणी आहेत ते सांगितले पाहिजे. दिल्लीतून सिग्नल मिळत नसेल तर तेही सांगावे. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना मंत्री, राज्यमंत्री तसेच महामंडळाच्या अध्यक्ष पदाचे  असे म्हणत अजित पवार यांनी टिका केली.  

युती, आघाडीचा निर्णय राजकीय परिस्थितीनुसारराज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कोणत्या पक्षासोबत युती किंवा आघाडी करायची याबाबत त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. शक्यतोवर पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले. 

त्यांना सद्बुध्दी मिळो...मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सद्बुध्दी मिळून मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस