शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला निदर्शनाची भीती? महापालिकेला आले छावणीचे स्वरूप

By प्रकाश गायकर | Updated: August 25, 2023 11:33 IST

अजित पवार गटाला निदर्शने आणि आंदोलनाची भीती वाटू लागली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे....

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून सत्ताधारी भाजपसोबत अजित पवार यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर ते शुक्रवारी पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महापालिकेत आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच निदर्शन विरोधी पथक तैनात करण्यात आले होते. त्यामुळे पक्ष फोडून सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी पक्षासह अजित पवार गटाला निदर्शने आणि आंदोलनाची भीती वाटू लागली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच महापालिकेत आले. पिंपरी चिंचवड शहरातही अजितदादा गट आणि साहेब गट असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला आहे. पक्षातील आमदार, माजी नगरसेवक व पदाधिकारी यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे. तर शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे. पक्षात फूट पडल्यापासूनच शहरातील राजकारण देखील ढवळून निघाले आहे. त्यातच आज अजित पवार शहरात सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत आले.

यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. दंगल नियंत्रण पथक व निदर्शने विरोधी पथकही महापालिका आवारात तैनात करण्यात आले होते. तसेच महापालिकेचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करत कर्मचाऱ्यांनाच आतमध्ये सोडले जात होते. मुख्य प्रवेशद्वारावर देखील मोठा पोलीस बंदोबस्त ठेवत प्रत्येकाची तपासणी करूनच आतमध्ये सोडले जात होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि निदर्शने विरोधी पथक नेमल्याने सत्ताधारी भाजपसह अजित पवार गटालाही निदर्शने आणि आंदोलनाची भीती वाटू लागली आहे का? अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका