शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत सफाई कामगारांचे विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 12:58 IST

साफसफाई कामगार महिलांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे : बाबा कांबळे 

ठळक मुद्देगेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी कामगारांची पिळवणूक सुरू

पिंपरी: गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक सुरू आहे. परंतु आता सफाई महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे यासाठी व त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले.

कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने सोमवारी सायंकाळी आंदोलन करून निवेदन देण्यात आले. पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्याध्यक्ष बळीराम काकडे , भीमा-कोरेगाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिता साळवे, प्रल्हाद कांबळे, सविता लोंढे , मंगल तायडे , मधुरा डांगे, कांताबाई कांबळे , आशा पठारे आदी उपस्थित होते. 

बाबा कांबळे म्हणाले, '' महानगरपालिकेत गेले वीस वर्षापासून आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांना नियमानुसार महानगरपालिकेने कायमच सेवेत घेतले पाहिजे. परंतु तसे न करता गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी कामगारांची पिळवणूक सुरू असून त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जात नाही , यापूर्वी देण्यात आलेले ठेके आता संपत आले असून पुन्हा त्याच ठेकेदारांना आणि इतर ठेकेदारांनसाठी पुन्हा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु ही निविदा रद्द करून कर्मचाऱ्यांना कायम करावे." .......... 

आंदोलन कर्त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सोळाशे साफ सफाई कामगार महिलांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले आहे. कोरोना आपत्ती काळात सेवा दिल्याबद्दल कायम कामगारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने भरघोष आर्थिक मदत दिली. मात्र, कंत्राटी पद्धतीने कामे करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांना मात्र, दीड हजार रुपये मदत करण्याचे जाहीर केले आहे, हि मदत अत्यंत तुटपुंजी आहे, किमान पाच हजार रुपये आर्थिक मदत करावी,दिवाळीनिमित्त पगार एवढा बोनस देण्यात यावा, साफसफाई कामगार महिलांचा थकीत प्राव्हिडन्ट फंड तातडीने देण्यात यावा, समान काम समान दाम या पद्धतीने आणि सरकारने ठरवून दिले प्रमाणे किमान वेतनाचा फरक मिळवून द्यावा, गेली अनेक वर्षांपासून साफसफाई कामगार महिला महानगरपालिकेत कामे करत आहेत, त्यांचे सेवेतील योगदान लक्षात घेता त्यांना कायमस्वरूपी महानगरपालिका सेवेत सामावून घ्यावे, घरकुल योजनेत साफसफाई कामगार महिलांना प्रधान्य देण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरEmployeeकर्मचारीWomenमहिला