शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारवर टीका करत पिंपरीत माकपतर्फे धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:36 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण

ठळक मुद्देदेशात घुसखोर आहेत ते शोधण्यासाठी विद्यमान कायदे पुरेसे

पिंपरी : नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अमानुष दडपशाहीमुळे विद्यार्थी आणि युवाशक्ती देशभर संताप व्यक्त करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. डॉ. सुरेश बेरी, गणेश दराडे, क्रांतिकुमार कडुलकर, सचिन देसाई, अपर्णा दराडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. स्वप्नील जेवळे, अविनाश लाटकर, ख्वाजा जमखाने, अनिरुद्ध चव्हाण, रंजना पवार, रंजिता लाटकर, नंदा शिंदे, शैलजा कडुलकर, शाजी, फिलिप, अनिलकुमार, पुनपन, संतोष गायकवाड आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. गणेश दराडे यावेळी म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अमानुष दडपशाहीमुळे विद्यार्थी आणि युवाशक्ती देशभर संताप व्यक्त करीत आहे. भारतीय संविधानातील सात मूलभूत अधिकारांचे उल्लंघन या कायद्यामुळे होत आहे. नोटबंदीमुळे सर्व देश रांगेत उभा होता. त्यामुळे देशवासीय परेशान झाले होते. आता नागरिकत्वासाठी पुन्हा रांगेत उभे राहावे लागेल काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.डॉ. सुरेश बेरी म्हणाले, देशात घुसखोर आहेत ते शोधण्यासाठी विद्यमान कायदे पुरेसे आहेत. एनआरसीमुळे सैन्यामधून निवृत्त झालेल्या लोकांना अभारतीय ठरवण्यात आले. आसाममध्ये अभारतीय लोकांना छळ छावणीत ठेवण्यात आले आहे. मुस्लिमद्वेषाचे राजकारण १९९२ पासून सुरू आहे. देशातील विचारवंत, युवापिढीच्या प्रतिक्रिया आणि अनेक विद्यापीठांमधील आंदोलने सरकारवरचा विश्वास उडाल्यामुळे होत आहेत.क्रांतिकुमार कडुलकर म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा त्वरित मागे घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या कायद्याचे विधेयक संसदीय समितीकडे व्यापक चचेर्साठी पाठवावे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक